Artemis II : नासाची २०२४ मध्ये चंद्रयान मोहीम; आर्टेमिस II मोहिमेसाठी केली चार अंतराळवीरांची निवड

Artemis II : नासाची २०२४ मध्ये चंद्रयान मोहीम; आर्टेमिस II मोहिमेसाठी केली चार अंतराळवीरांची निवड

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने सोमवारी आर्टेमिस II या चंद्र मोहिमेसाठी पहिल्या महिलेसह चार अंतराळवीरांची टीम जाहीर केली. आर्टेमिस II मोहिमेअंतर्गत जेरेमी हॅन्सन, व्हिक्टर ग्लोव्हर, रीड विजमन आणि क्रिस्टीना हॅमॉक कोच हे चार अंतराळवीर पुढील वर्षी चंद्रावर जाणार आहेत.

2024 मध्ये चंद्रावर उड्डाण करेल

या टीम मध्ये यूएस नेव्हीचे माजी पायलट रीड वायझमन, आफ्रिकन अमेरिकन मरीन व्हिक्टर ग्लोव्हर, अंतराळवीर क्रिस्टीना कोच, कॅनडाचे अंतराळवीर जेरेमी हॅन्सन यांचा समावेश आहे. क्रिस्टीना कोच यांच्या नावावर एका महिलेने सर्वात जास्त काळ अंतराळ उड्डाण करण्याचा विश्वविक्रम आहे. गेल्या वर्षीची आर्टेमिस II मोहीम यशस्वी झाली होती. ही एक मानवरहित चंद्र मोहीम होती. १९६९ मध्ये मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. नील आर्मस्ट्राँग १९६९ मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले होते.

कोण आहे क्रिस्टीना कोच?

NASA ने सोमवारी चंद्राच्या मोहिमेसाठी अंतराळवीर म्हणून नियुक्त केलेल्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अमेरिकन महिलेचे नाव जाहिर केले. क्रिस्टीना कोच (वय ४४) चंद्रावर जाणारी पहिली महिला अंतराळवीर एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. तिने ३२८ दिवस अंतराळात वास्तव्य केले होते. एका महिलेने अंतराळात सर्वात जास्त काळ राहण्याचा विक्रम तिने केला आहे. तिने ऑक्टोबर २०१९ मध्ये पहिल्या ऑल फीमेल स्पेसवॉकमध्ये नासा अंतराळवीर जेसिका मीरसह भाग घेतला होता. तसेच जेरेमी हॅन्सन (वय ४७) हा कॅनडाचा रहिवासी आहे. कॅनेडियन स्पेस एजन्सीमध्ये सामील होण्यापूर्वी ते रॉयल कॅनेडियन एअर फोर्समध्ये फायटर पायलट होते. ही त्याची पहिली अंतराळ मोहीम असेल.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news