पुढारी ऑनलाईन डेस्क : क्वीन्सलँडच्या किनार्याजवळ (Australia) हॅमिल्टन बेटावर शुक्रवारी उशिरा ऑस्ट्रेलियन लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत ४ क्रू मेंबर्स बेपत्ता झाले आहेत. लष्करी हेलिकॉप्टर अमेरिकेसोबतच्या संयुक्त लष्करी सरावात सहभागी होत असताना हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
Australia : 'तावीज सेबर' ऑपरेशन थांबवले
ऑस्ट्रेलियन (Australia) संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी सांगितले की, MRH90 या हेलिकॉप्टरने प्रशिक्षण ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता चार क्रू मेंबर्ससह हेलिकॉप्टर क्रॅश झाले. दुसऱ्या हेलिकॉप्टरने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. या अपघातानंतर 'तावीज सेबर' ऑपरेशन स्थगित करण्यात आले आहे.
'तावीज सबरे' ऑपरेशनमध्ये यूएस मरीन आणि ऑस्ट्रेलियन लष्कराचा एकत्र सराव करत होते. अमेरिका, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियासह 13 देशांचा समावेश असलेल्या 'तावीज सबरे'मध्ये सुमारे ३० हजार लष्करी जवान सहभागी झाले आहेत. पापुआ न्यू गिनी, फिजी आणि टोंगा प्रथमच सहभागी झाले आहेत.
हेही वाचा