Global Boilingची सुरुवात; जुलै २०२३ गेल्या १ लाख २० हजार वर्षांतील सर्वांत उष्ण | July hottest month on record

world global warming
world global warming

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक तापमान वाढीचे युग आता संपले असून पृथ्वीने ग्लोबल बॉयलिंग (Global Boiling)च्या युगात प्रवेश केला आहे, असा गंभीर इशार संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेट्री जनरल अँटानिओ गुट्रेस यांनी दिला आहे. या वर्षातील जुलै महिना जगातील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण महिना ठरल्याचे संशोधकांनी जाहीर केल्यानंतर गुट्रेस यांनी हा इशार दिला आहे. (July hottest month on record)

"जागतिक हवामान बदल ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती भीतीदायक आहे आणि आता फक्त सुरुवात झालेली आहे," असे ते म्हणाले. तातडीने, महत्त्वपूर्ण पावले उचलली तर आपण अजूनही जागतिक तापमान वाढीचे भयंकर संकट टाळू शकतो. औद्योगिककरणाच्या पूर्वीच्या तुलनेत फक्त १.५ टक्के तापमान वाढ रोखता येणे अजूनही शक्य आहे, असे ते म्हणाले. द गार्डियनने ही बातमी दिली आहे.

तापमानच्या नोंदी ठेवायला सुरू केल्यापासूनचा विचार केला तर जुलै महिन्याचे पहिले तीन आठवडे सर्वाधिक उष्ण ठरले आहेत, तसेच जुलै महिना आतापर्यंतचा सर्वांत उष्ण महिना बनण्याच्या मार्गावर आहे. जुलै महिन्याच्या तापमानाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत, अशी माहिती World Meteorological Organization आणि EU's Copernicus Earth या संस्थांनी दिली आहे.

गुरुवारी गुट्रेस यांनी पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी ही माहिती दिली. आज मानवता हॉट सीटवर आहे, उत्तर अमेरिका, अशिया, आफ्रिका, युरोप मध्य़े जुलै महिना क्रुर ठरला आहे. आपल्या ग्रहासाठी ही एक आपत्ती आहे. आणि यासाठी मनुष्य जबाबदार आहे, यावर संशोधकांचे एकमत आहे, असे ते म्हणाले. अर्थात जो अंदाज वर्तवला होता, त्याप्रमाणेच हे घडत आहे, पण ज्या वेगाने हे घडत आहे ते धक्कादायक आहे, असे ते म्हणाले. जगभरातील राजकीय नेत्यांनी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news