UFO Hearing | अमेरिकेकडे आहेत एलियन्सचे मृतदेह, माजी गुप्तचर अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

UFO Hearing | अमेरिकेकडे आहेत एलियन्सचे मृतदेह, माजी गुप्तचर अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

वॉशिंग्टन, पुढारी ऑनलाईन : एलियन्स अस्तित्वात आहेत की नाही? यावर अनेकदा चर्चा होते. या ब्रह्मांडात मानवाव्यतिरिक्त एलियन्सची जीवसृष्टी आहे का? या प्रश्नाचे उत्तर अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ शोधत आहेत. मात्र याबाबत अमेरिकेचे माजी गुप्तचर अधिकारी डेव्हिड ग्रुश (former US intelligence officer David Grusch) यांनी मोठा खुलासा केला आहे. यामुळे अमेरिकेसह जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. (UFO Hearing)

डेव्हिड ग्रुश यांनी बुधवारी काँग्रेस हाऊस समितीसमोर खुलासा केला की अमेरिकी सरकारच्या ताब्यात अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट (UFOs) आणि मृतदेह आहेत. हे मृतदेह (non-human bodies) मानवाचे नाहीत. अमेरिकन सरकार एलियन्सच्या यानाला आश्रय देत असल्याचा दावा ग्रुश यांनी जूनमध्ये केला होता. त्यावर ही सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर ग्रुश यांनी वॉशिंग्टनमधील हाऊस निरीक्षण समितीसमोर शपथपूर्ण अनेक धक्कादायक खुलासे केले.

अमेरिका सरकारकडे "क्रॅश क्राफ्ट्स"चे पायलट आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना ग्रुश म्हणाले, "होय! काहीतरी मिळाले आहे." ते पुढे म्हणाले की हे जीव मानवी नव्हते. जे या विषयाचे तज्ज्ञ आहेत त्यांनी याचे मूल्यांकन केले होते.

जूनमध्ये त्यांनी आरोप केला होता की सरकार अमेरिकी काँग्रेसपासून परग्रहवासीयांबद्दल मिळालेले पुरावे लपवत आहे. त्याच्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर रिपब्लिकनच्या नेतृत्वाखालील निरीक्षण समितीने त्याच्या दाव्यांची चौकशी सुरू केली होती.

या सुनावणीदरम्यान ग्रुश यांनी खासदारांना सांगितले की, मानवी नसलेले काही जीव सरकारने ताब्यात घेतले आहे. पण त्यांनी असेही मान्य केले की त्यांनी कधीही एलियन्सचे शरीर पाहिलेले नाही. त्यांनी असेही सांगितले की, त्यांनी स्वतः कथित एलियनचे यान पाहिलेले नाही आणि आणि त्यांचे हे दावे उच्चस्तरीय गुप्तचर अधिकाऱ्यांच्या विस्तृत मुलाखतींवर आधारित आहेत.

ग्रुश असेही म्हणाले की अमेरिका सरकारने "मल्टिडिकेड" कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचा उद्देश कोसळलेल्या परग्रहवासीयांच्या अज्ञात उडणाऱ्या वस्तूंचे अवशेष जमा करण्याचा होता.

दरम्यान, अमेरिकी सरकारने असे काही पुरावे लपवल्याचा ग्रुश यांचा दावा फेटाळून लावला. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने द गार्डियन वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, "परग्रहवासीयांचे कोणतेही अवशेष याआधी आणि सध्याही अद्याप तपासकर्त्यांना सापडलेले नाहीत." (UFO Hearing)

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news