‘पेंटॅगॉन’ला वाटते, असू शकतात एलियन्स! | पुढारी

‘पेंटॅगॉन’ला वाटते, असू शकतात एलियन्स!

वॉशिंग्टन : ‘यूएफओ’ किंवा ‘यूफो’ म्हणजे ‘अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्टस्’. हा शब्द सहसा एलियन्सच्या कथित अशा गूढ अंतराळयानांशी जोडला जात असतो. मराठीत त्याला ‘उडती तबकडी’ असे म्हटले जाते. अशा उडत्या तबकड्यांमधून परग्रहावरील लोक पृथ्वीवर येत असतात असे म्हटले जाते. जगभरातून अशा ‘यूफो’ पाहिल्या गेल्याचे दावे करण्यात आलेले आहेत.

आता अमेरिकेचे लष्करी मुख्यालय ‘पेंटॅगॉन’कडूनही याबाबतचा अभ्यास करण्यात आला आहे. पेंटॅगॉनचे ऑल-डोमेन एनोमली रेजोल्युशन ऑफिस (एएआरओ)चे प्रमुख सीन किर्कपॅट्रिक आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अब—ाहम लोएब यांच्याकडून एका संशोधनात ‘यूफो’चा उल्लेख झाला आहे. या अभ्यासाची अद्याप समीक्षा झालेली नसली तरी एलियन्सचे अस्तित्व असू शकते असा त्याचा सूर आहे.

पेंटॅगॉन यूएफओ प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार सौरमंडळात एलियन्सचे मदरशिप असू शकते. पेंटॅगॉनने एका घटनेवर संशोधन करून एक ड्राफ्ट तयार केला आहे. या ड्राफ्टनंतर पेंटॅगॉनचे म्हणणे आहे की सौर मंडळातील ग्रहांवर अशा असामान्य मदरशिप व छोट्या वस्तूंचा प्रवास होत असावा.

पेंटॅगॉनच्या ऑल-डोमेन अनोमली रिझोल्युशन ऑफिसचे संचालक शॉन किर्कपॅट्रिक यांनी लिहिले आहे की एक आर्टिफिशियल इंटरस्टेलर ऑब्जेक्ट पृथ्वीच्या जवळ आल्यावर काही छोट्या वस्तू लाँच करू शकते. या छोट्या वस्तूंना वैज्ञानिकांनी ‘ओउमुआमुआ’ असे नाव दिले आहे. ‘यूएफओ’ शब्द 1952 मध्ये अमेरिकन हवाई दलाने अस्तित्वात आणला होता. तत्पूर्वी, पाच वर्षे आधी अमेरिकन हवाई दलाचे पायलट नेथ अर्नोल्ड यांनी उडत्या तबकड्यांबाबत जगाला माहिती दिली होती. अर्नोल्ड यांनी 1947 मध्ये वॉशिंग्टनच्या माऊंट रेनियरवरून विमानाचे उड्डाण केले होते. त्यावेळी त्यांना अत्यंत चमकदार अशी उडती वस्तू दिसली होती.

Back to top button