इस्लामाबाद : वृत्तसंस्था सीमा हैदर या भारतात आलेल्या तरुणीला पाकिस्तानच्या स्वाधीन न केल्यास पाकिस्तानातील हिंदू मंदिरांवर, हिंदूंवर हल्ले करू, अशी धमकी सीमा हैदर हिच्या समुदायातील लाँचर, एके-४७ धारक बलुच दरोडेखोरांच्या गँगने दिली होती… आणि शनिवारी तसेच रविवारी मिळून २४ तासांत पाकिस्तानातील दोन हिंदू मंदिरांवर हल्ले झाले. सिंधमधील काश्मीरमधील हिंदू बागडी समाजाच्या मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला गेला. दहाजणांच्या जमावाने हिंदूंच्या घरांवर अंदाधुंद गोळीबारही केला. (Seema Haider case)
सीमा हैदर (वय २७) हिने पाकिस्तानातून आपल्या तीन मुली आणि एका मुलासह भारतात व्हिसाशिवाय दाखल होऊन सचिन 'मीणा (२२) या युवकाशी विवाह केला. आणि हिंदू धर्म स्वीकारला आहे. पाकिस्तानात हाच एक विषय सध्या चर्चिला जात आहे. सीमा हैदरला भारताने पाकिस्तानात परत पाठवावे, अन्यथा पाकिस्तानातील हिंदूंचे जगणे कठीण केले जाईल, मंदिरे उडविली जातील, अशी जाहीर धमकी रानो शार या कुख्यात दरोडेखोराने एका व्हिडीओतून दिली होती.
रविवारी सिंधमधील काश्मीरमधील हिंद बागडी समाजाच्या मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला गेला. तत्पूर्वी, शनिवारी रात्री कराचीतील सोल्जर बाजारातील दीडशे वर्षांपूर्वीचे मरी माता मंदिर बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आले होते. काश्मीरमध्ये घौसपू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरांवर तसेच हिंदूंच्या घरांवर जमावाने हल्ला केला. मंदिरावर रॉकेट लाँचर डागले. हिंदूंच्या घरांवर अंदाधुंद गोळीबार केला. आवाजाने काश्मोर-कंधकोट वरिष्ठ पोलिस अधिकारी इरफान यांच्यासह पोलिस दाखल झाले. जमावाने मंदिरावर रॉकेट डागल्याचे इरफान यांनी सांगितले.
यावेळी सुदैवाने मंदिर बंद होते, अन्यथा मोठी जिवित हानी झाली असती, असेही ते म्हणाले. पोलिस दाखल होताच हल्लेखोर पळून गेले.
तीस हिंदूंना ओलिस ठेवले.
सीमा हैदरला भारताने पाकच्या स्वाधीन करावे म्हणून महिला आणि मुलांसह हिंदू समुदायातील ३० जणांना एका संघटित गुन्हेगारी टोळीने ओलिस ठेवल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.
हेही वाचा