South Korea Flood : दक्षिण कोरियात पावसाचा कहर; पुरामुळे २२ जणांचा मृत्यू, १४ बेपत्ता | पुढारी

South Korea Flood : दक्षिण कोरियात पावसाचा कहर; पुरामुळे २२ जणांचा मृत्यू, १४ बेपत्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पुरामुळे आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण बेपत्ता आहेत. पुरामुळे हजारो लोकांना बेघर व्हावे लागले आहे. सध्या सरकारी यंत्रणेकडून मदतकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यत वर्तवली जात आहे. देशभरात मुसळधार पावसामुळे सुमारे ४७६३ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

ओसोंग शहरातील भुयारी मार्गात १९ वाहने पाण्यात बुडाली आहेत. उत्तर ग्योंगसांगमध्ये भूस्खलन आणि घरे कोसळून सुमारे १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दक्षिण चुंगचेंग प्रांतात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नॉनसान भागातही भूस्खलनामुळे इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. सरकारी यंत्रणा झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करत असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सेजोंग शहरात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, येओंगजूच्या आग्नेय काउंटी आणि चेओन्गयांगच्या मध्यवर्ती काउंटीमध्ये घर कोसळल्यामुळे तीन मृत्यूची नोंद झाली आहे. त्याचवेळी, चेओंगजू येथे भूस्खलनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, गोसानमधील सुमारे ६,४०० रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button