‘काय खायचे याची काळजी घेईन’: अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष असे का म्‍हणाले? | पुढारी

'काय खायचे याची काळजी घेईन': अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष असे का म्‍हणाले?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियाचे अध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्‍याविरोधात बंड पुकारल्‍यानंतर ‘वॅगनर’ खासगी लष्कर समूहाचे प्रमुख येवगिनी प्रिगोझीन हे चर्चेत आले. आता त्‍यांना विषबाधा झाल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. तसेच पुतिन यांनी वॅगनर ग्रुपला कायदेशीर अस्‍तित्‍व नाही, असे स्‍पष्‍ट केले आहे. याची अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन ( Joe Biden ) यांनी खिल्‍ली उडवली आहे.

प्रिगोझीन यांनी जून २०२३ मध्‍ये पुतिन यांच्‍याविरोधात केलेले बंड औटघटकाचे ठरले. अवघ्‍या काही तासांमध्‍ये त्‍यांनी बंडाची तलवार म्‍यान केली. प्रिगोझीन यांना बंडाची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा पुतिन यांनी दिला होता. यानंतर त्‍यांनी बेलारुसमध्‍ये आश्रय घेतला. यानंतर आता प्रिगोझीन यांना विषबाधा झाल्‍याची चर्चा आहे.

वॅगनर अस्‍तित्‍वात नाही : पुतिन यांच्‍या स्‍पष्‍टोक्‍तीनंतर चर्चेचा उधाण

रशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियात वॅगनर हे खासगी लष्‍कर अस्‍तितवाच नाही. अशा लष्‍करी संघटनांबाबत कोणताही कायदा अस्‍तित्‍वातही नाही, असे ररशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांनी म्‍हटले आहे. त्‍यांच्‍या या विधानामुळे प्रीगोझिन आणि वॅगनर यांचे भविष्याबद्‍दल सांशकता व्‍यक्‍त होत असून, प्रिगोझिन यांना विषबाधा झाल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

 मी काय खायचे याची काळजी घेईन : ज्‍यो बायडेन

२४ जून रोजी प्रिगोझीन यांनी रशियातून पलायन केल्‍याचे वृत्त आहे. त्‍यांनी बेलारुसला आश्रय घेतल्‍याची चर्चा होती. आता त्‍यांना विषबाधा झाल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. यावर अमेरिकेचे अध्यक्ष ज्‍यो बायडेन म्‍हणाले की, “प्रीगोझिन कोठे आहे हे अमेरिकेला देखील माहित नव्हते; परंतु भाडोत्री लष्‍कर प्रमुखाला विष दिले जाऊ शकते.जर मी त्याच्या जागी असतो, तर मी काय खायचे याची काळजी घेईन. मी माझा मेनू पाहीन. ​​रशियामध्ये प्रीगोझिनचे भविष्य काय आहे हे कोणालाही ठाऊक नाही, अशा शब्‍दांमध्‍ये त्‍यांनी रशियाची खिल्‍ली उडवली.”

वॅगनर प्रमुख आणि पुतिन संघर्ष

‘वॅगनर’ खासगी लष्कर समूहाने २०१४ मध्‍ये क्रिमियावर वर्चस्‍व मिळवण्‍यासाठी रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांना मदत केली होती. मात्र मागील महिन्‍यात प्रिगोझीन यांनी पुतिन यांच्‍याविरोधात बंड केले. त्‍यांनी रोस्तोव्ह शहरानंतर मॉस्कोपासून सुमारे 500 कि.मी.वरील वोरोनेझ शहरातील अण्वस्त्रसाठाही ताब्यात घेतला होता. त्यामुळेच रशियन सरकारी सैन्य बचावात्मक पवित्र्यात आले आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सहमती द्यावी लागली. नंतर पुतीन यांच्या सांगण्यावरूनच बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी प्रिगोझीन यांना वाटाघाटीस तयार झाले होते.

प्रिगोझीन यांनी घेतला बेलारुसला आश्रय

मॉस्कोच्या दिशेने सुरू केलेली कूच अर्ध्यावर सोडून व्होरोनेझमधील आण्विकसाठ्याच्या दिशेने त्यांनी मोर्चा वळविला आणि आपली मोहीम संपविली. या अण्वस्त्रसाठ्याचा वापर प्रिगोझीन यांनी स्वत:च्या सुरक्षिततेची हमी म्हणून केला. पुतीन यांना ती द्यावी लागली आणि प्रिगोझीन सुरक्षितपणे बेलारूसला पोहोचू शकले होते. प्रिगोझीन जर रशियाच्या अण्वस्त्रसाठ्यापर्यंत पोहोचू शकतात, तर चेचेन नेते रमजान कादिरोव्हही हे कृत्य करू शकतात आणि तसे घडल्यास अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडू शकतात व जगाला धोका होऊ शकतो, अशी भीती आता आंतरराष्ट्रीय वर्तुळातून व्यक्त करण्‍यात आली होती.

हेही वाचा :

 

Back to top button