डॉक्टरांचा चमत्कार: कार अपघातात शरीरापासून वेगळं झालेलं मुलाचं डोकं पुन्हा जोडलं, इस्रायलमधील घटना

डॉक्टरांचा चमत्कार: कार अपघातात शरीरापासून वेगळं झालेलं मुलाचं डोकं पुन्हा जोडलं, इस्रायलमधील घटना
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: इस्रायली डॉक्टरांनी असा चमत्कार करून दाखवला आहे की, ज्याबद्दल ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. काही दिवसांपूर्वी इस्राय एका १२ वर्षीय मुलाचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याचे डोके शरीरापासून वेगळे झाले. त्याच्या जगण्याची फारशी आशा नव्हती. त्याचं डोकं फक्त त्वचेला जोडलं होतं, परंतु डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्या मुलाचे डोके परत जोडले आणि जीव वाचवला.

द टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, पॅलेस्टाईनचा रहिवासी असलेला १२ वर्षीय सुलेमान हसन रस्त्याने सायकलवरून जात असताना त्याचा कारसोबत अपघात झाला. कारने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला तीक्ष्ण जखम झाली आणि डोके शरीरापासून वेगळे झाले. त्याचे डोके फक्त त्वचेने जोडलेले होते. ही स्थिती वैज्ञानिकदृष्ट्या द्विपक्षीय अटलांटो-ओसीसीपीटल संयुक्त अव्यवस्था म्हणून ओळखली जाते.

डोके शरीरापासून वेगळे झाले

अपघातानंतर मुलाला विमानाने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे त्याला तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याचे डोके त्याच्या मानेपासून जवळजवळ पूर्णपणे वेगळे झाले होते. मुलावर उपचार करणारे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. ओहाद ईनाव यांनी द टाइम्स ऑफ इस्रायलला सांगितले की, शस्त्रक्रियेला अनेक तास लागले, परंतु आम्ही ही प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडली. त्यासाठी नवीन प्लेट्स आणि फिक्सेशन लावावे लागले. आम्ही मुलाला वाचवण्यासाठी खूप धडपड केली आणि शेवटी यश मिळालं. सर्जनच्या म्हणण्यानुसार मुलाची रिकव्हरी ही एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती, कारण त्याच्या जगण्याची धाकट्या केवळ 50 टक्के होती.

या मुलाचे ऑपरेशन हे गेल्या म्हणजेच जून महिन्यात झाले, परंतु डॉक्टरांनी जुलैपर्यंत कोणालाच काही सांगितले नाही. काही दिवसांपूर्वीच मुलाला सर्वाइकल स्प्लिंटच्या कारणामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टर ईनाव यांनी सांगितले की, सध्या मुलाची तब्येत एकदम ठणठणीत आहे. त्याला कुठलीही न्यूरोलॉजिकल समस्या नाही. एवढ्या मोठ्या ऑपरेशननंतर तो स्वतःहून चालत आहे आणि ते अगदी सामान्य आहे. ते पुढे म्हणाले की, अशा दुर्मिळ शस्त्रक्रियांसाठी विशेष डॉक्टरांची आवश्यकता असते. ही सामान्य शस्त्रक्रिया अजिबात नाही. विशेषतः लहान मुलांसाठी अजिबात नाही. हे करण्यासाठी ज्ञान आणि अनुभव आवश्यक आहे. रिपोर्ट्सनुसार, मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाला क्षणभरही एकटे सोडले नाही. आपल्या, एकुलत्या एक मुलाला वाचवल्याबद्दल त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. सध्या मुलगा त्याच्या घरी सुरक्षित असून सामान्य आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news