Jammu and Kashmir | जम्मू- काश्मीरला पाठोपाठ भूकंपाचे दोन धक्के | पुढारी

Jammu and Kashmir | जम्मू- काश्मीरला पाठोपाठ भूकंपाचे दोन धक्के

पुढारी ऑनलाईन : जम्मू आणि काश्मीरला सोमवारी भूकंपाचे दोन धक्के बसले. पहिला धक्का बसलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.९ इतकी होती, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने दिली आहे. जम्मू- काश्मीरच्या डोडा भागात हा भूकंप झाला आहे. याचा केंद्रबिंदू १० किमी खोलवर आहे. हा भूकंप पहाटे ५ वाजून ३८ मिनिटांनी झाला. या भूकंपामुळे कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, यानंतर ५ वाजून ४३ मिनिटांनी चिनाब खोऱ्यातही भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी होती. जम्मू- काश्मीरमध्ये पाठोपाठ दोन धक्के बसले आहेत. याआधी ४ जुलै रोजी कारगिल, लडाख भागाला भूकंपाचा धक्का बसला होती. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी होती.    

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, सोमवारी अफगाणिस्तानच्या फैजाबाद येथेही ४.४ तीव्रतेचा भूकंप झाला. (Jammu and Kashmir)

 हे ही वाचा :

Back to top button