Johannesburg gas leak | दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये गॅस गळतीमुळे १६ जणांचा मृत्यू

Johannesburg gas leak | दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये गॅस गळतीमुळे १६ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या पूर्वेकडील बोक्सबर्ग जवळील एका वस्तीत विषारी वायूच्या गळतीमुळे सुमारे १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतचे वृत्त reuters ने दिले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गौतेंग प्रांताचे प्रीमियर पन्याझा लेसुफी यांनी घटनास्थळाला भेट दिली असताना पत्रकारांना सांगितले की कोणत्या प्रकारची वायू गळती झाली आहे याचा शोध घेतला जात आहे. "या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे," अशी माहिती लेसुफी यांनी दिली. याआधी मृतांची संख्या २४ असल्याची माहिती समोर आली होती. (Johannesburg gas leak)

दक्षिण आफ्रिकेतील पोलिसांनी सांगितले की, जोहान्सबर्गजवळ एका सिलिंडरमधून एका विषारी वायूची गळती होऊन तीन मुलांसह सुमारे १६ जणांचा मृत्यू झाला. आपत्कालीन सेवा विभागाकडून सांगण्यात आले आहे की ही वायू गळती बेकायदेशीर खाणीमुळ झाल्याची शक्यता आहे. मृतांमध्ये १, ६ वर्ष आणि १५ वर्षाच्या मुलांचा समावेश आहे. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

अँजेलो वस्तीमध्ये झोपडीत ठेवलेल्या गॅस सिलिंडरमधून ही गळती झाल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील बेरोजगारीमुळे बेकायदेशीर खाण व्यवसायात वाढ झाली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news