Japan's Princess Mako : जपानच्या राजकुमारीने केले प्रियकराशी लग्न - पुढारी

Japan's Princess Mako : जपानच्या राजकुमारीने केले प्रियकराशी लग्न

टोकियो : पुढारी ऑनलाईन

प्रेम लाभे प्रेमळाला, त्‍याग ही त्‍याची कसोटी ! हे कवितेचे शब्‍द खर्‍या अर्थाने जगली आहे जपानची राजकुमारी माको. ( Japan’s Princess Mako) तिने राजकुमारी पदाचा त्‍याग करत  सर्वसामान्‍य कुटुंबातील आपल्‍या प्रियकराशी लग्‍न केले आहे. दुसर्‍या महायुद्‍धानंतर सामान्‍य नागरिकाशी लग्‍न करणारी ती जपानमधील राजघराण्‍यातील पहिली सदस्‍य आहे.

( Japan’s Princess Mako) माको (३०) ही सम्राट नारुहितो यांची भाची आहे. राजकुमारी माको हिने सामान्‍य नागरिक असलेल्‍या केई कोमुरो (Kei Komuro) यांच्‍याशी दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते; पण जपानी राजघराण्यातील काही नियमांमुळे या दोघांचा विवाह होत नव्हता. अखेर सर्व बंधने आणि राजघराण्यातील लाभ झुगारून माको हीने मंगळवारी आपल्या स्वप्नातील राजकुमाराशी विवाह केला.

आपल्‍या प्रियकराशी लग्‍न करण्‍यासाठी माको हिने आपले ‘राजकुमारी’ पदाचाही त्याग केला आहे. एका साध्या समारंभात दोघांनी विवाह केला. हे नवपरिणित दाम्पत्य आता अमेरिकेत स्थलांतरित होणार आहे, जिथे केईने नुकतेच आपले शिक्षण पूर्ण करून एका लॉ फर्ममध्ये नोकरी सुरू केली आहे. तीस वर्षांची माको ही जपानचे सम्राट नारुहितो यांचे बंधू प्रिन्स फुमीहितो यांची थोरली कन्या आहे.

१२.३ दशलक्ष डॉलर स्‍वीकारण्‍यासही दिला नकार

जपान मधील राजघराण्‍यातील नियमांनुसार सामान्‍य नागरिकाशी लग्‍न केल्‍याने माको हिने शाही दर्जा गमावला आहे. विशेष म्‍हणजे १४० दक्षलक्ष येन (जपानचे चलन) १२.३ दशलक्ष डॉलर स्‍वीकारण्‍यासही तिने नकार दिला आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button