Donald Trump : ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला दाखल होणार? | पुढारी

Donald Trump : ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला दाखल होणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा  चर्चेत आले आहेत. २०२१ मध्ये अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ट्रम्प यांच्यावर अनेक वर्गीकृत कागदपत्रे त्यांच्या घरी नेल्याचा आरोप आहे. गुप्तचर कागदपत्रे घरी नेल्याप्रकरणी त्यांच्यावर ७ आरोप दाखल करण्यात आले आहेत. तर १३ जून रोजी न्यायालयात हजर होतील. (Donald Trump)

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानूसार, विशेष परिषदेने आपला तपास पूर्ण केला आहे आणि लवकरच ट्रम्प यांच्यावर फौजदारी आरोप लावण्याची तयारी सुरु केली आहे. ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला दाखल होऊ शकतो. तपासाबाबत ट्रम्प म्हणाले की, माझ्यावर फौजदारी आरोप लावले जातील, अशी कोणतीही माहिती मला मिळालेली नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही.

Donald Trump : हे राजकीय षडयंत्र 

ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे की, त्यांच्याविरुद्ध सुरू असलेले सर्व खटले हे राजकीय षडयंत्र आहे. त्‍यांच्‍या मते, २०२४ मध्ये होणाऱ्या राष्‍ट्रपतीपदाची निवडणूक लढवू नये यासाठी हे केले जात आहे. त्यांच्या एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, त्यांना मंगळवारी मियामी येथील फेडरल कोर्टात बोलावण्यात आले आहे. त्यांनी लिहिले की, अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या बाबतीत असे घडू शकते, असे मला कधीच वाटले नव्हते.

काय आहे ट्रम्प यांच्या गुप्त कागदपत्रांशी संबंधित वाद?

जानेवारी २०२१ मध्ये व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना, ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडा येथील रिसॉर्ट मार-ए-लागोमध्ये अनेक वर्गीकृत कागदपत्रे घेऊन गेल्याचा आरोप होता. ही कागदपत्रे राष्ट्रीय अभिलेखागारला (National Archives) देण्यासही ट्रम्प यांनी नकार दिला. यानंतर हे प्रकरण एफबीआयपर्यंत पोहोचले. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, एफबीआयने तपासात ट्रम्प यांचे घर मार-ए-लागो आणि त्यांच्या खासगी क्लबमधून 300 हून अधिक गुप्त कागदपत्रे जप्त केली आहेत.

Donald Trump : ट्रम्प यांच्यावर ३४ आरोप 

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ३४ प्रकरणांमध्ये आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, या सर्व प्रकरणात त्याने स्वत:ला निर्दोष घोषित केले आहे. टेक्सासच्या रॅलीतही त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगून विरोधक मला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. मात्र, यात ते अपयशी ठरले आहेत. माझ्याविरुद्ध विरोधकांनी केलेल्या कटाने मला अधिक बळ दिले आहे.

हेही वाचा

Back to top button