Job Fire In China : वारंवार टॉयलेटच्‍या सवयीमुळे नाेकरी गमावली! न्यायालय म्‍हणाले, ‘कंपनीचा निर्णय योग्यच’

Job Fire In China : वारंवार टॉयलेटच्‍या सवयीमुळे नाेकरी गमावली! न्यायालय म्‍हणाले, ‘कंपनीचा निर्णय योग्यच’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तरुणाईला सध्या बेरोजगारीसह नोकरकपातचाही प्रश्न भेडसावत आहेत. नोकरी मिळवायची कशी आणि मिळालेली नोकरी टिकवायची असे दुहेरी आव्‍हान आजच्‍या तरुणांसमोर आहेत.  एका नामांकित कंपनीतील मिळालेली नाेकरी तरुणाला गमवावी लागली आहे.  विशेष म्हणजे या नोकरकपातीचे कारण आगळंवेगळं आहे. हे कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल.  (Job Fire In China)

चीनमधील हा प्रकार असून,  वांग नावाचा तरुण चीनमधील एका नामांकित कंपनीत २००६ मध्ये रुजू झाला होता. डिसेंबर २०१४ मध्ये त्याला गुदद्वाराचा आजार उद्भवला. दरम्यान, त्याने वैद्यकीय उपचार घेण्यास सुरुवात केली. हा कर्मचारी वारंवार बाथरुममध्ये जात होता. त्याला होत असणारा त्रास यामुळे त्याचा कामापेक्षा जास्त वेळ टॉयलेटमध्ये जात होता. कंपनीने याच गोष्टीचे कारण देत त्याला नोटीस बजावली. यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याला जास्त वेळ बाथरुममध्ये गेल्याच्या कारणास्तव कामावरुन काढण्यात आले असे सांगण्यात आले. (Job Fire In China)

कंपनीने करार रद्द केला | Job Fire In China

कंपनीच्या नोंदीनुसार, ७ ते १७ सप्टेंबर २०१५ दरम्यान, वांगने एका शिफ्टमध्ये दोन ते तीनवेळा स्वच्छतागृहाचा वापर केला आहे. या प्रत्येक वेळी तो सुमारे एक ते तीन तास टॉयलेटमध्ये असायचा. यामुळे कंपनीने २३ सप्टेंबर २०१५ रोजी त्याचा करार रद्द केला. आळस, कार्यालय लवकर सोडणे आणि अस्पष्ट सुट्ट्या अशा नोंदी या कर्मचाऱ्याच्या हँडबुकमध्ये करण्यात आली हाेती.

न्यायालयाने देखील घेतली कंपनीची बाजू | Job Fire In China

संबंधित चीनी कंपनीविरोधात वांग यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. नोकरीवर परत रुजू करावे, अशी मागणी त्‍याने या याचिकेतून केली हाेती. मात्र चीनच्‍या न्यायालयांनी त्यांची बडतर्फीचा आदेश कायदेशीर आणि योग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्याच्या प्रदीर्घ नित्यनियमाने प्रसाधनगृहाचा वापर करणे अतार्किक मानले गेले. चिनी सोशल मीडियावर ही बातमी चांगलीच गाजत असून प्रत्येकजण कंपनीची बाजू घेत आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news