Alien Planet : भारतीय शास्त्रज्ञांची कमाल, सौरमालेच्या बाहेर गुरूपेक्षा 13 पट मोठा ‘एलियन ग्रह’ शोधला

गुरूपेक्षा 13 पट मोठा ग्रह शोधला
गुरूपेक्षा 13 पट मोठा ग्रह शोधला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : Alien Planet : एका भारतीय प्राध्यापकाच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने एक मोठा शोध लावला आहे. या टीमने गुरूपेक्षा 13 पट मोठा ग्रह शोधला आहे. प्राध्यापक अभिजित चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील भौतिक संशोधन प्रयोगशाळेने (पीआरएल) सौरमालेबाहेरील या ग्रहाचा शोध लावला आहे. ही प्रयोगशाळा अहमदाबाद येथे आहे. या ग्रहाचे वस्तुमान 14 g/cm3 आहे.

Alien Planet : टीममध्ये अनेक देशांतील शास्त्रज्ञांचा समावेश

विशेष म्हणजे आपल्या सौरमालेबाहेरील हा तिसरा ग्रह आहे. ज्याचा शोध भारत आणि पीआरएलच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे. खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी पत्रे जर्नलमध्ये या ग्रहाविषयी तपशील प्रकाशित करण्यात आले आहेत. या टीममध्ये भारत, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

Alien Planet : ग्रहाचे वस्तुमान 14 g/cm3 आहे

ग्रहाचे अचूक वस्तुमान निश्चित करण्यासाठी, टीमने माउंट अबू येथील गुरुशिखर वेधशाळेत स्वदेशी PRL Advanced Radial-velocity Abu-Sky Search Spectrograph (PARAS) चा वापर केला. शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, सूर्यमालेच्या बाहेर या ग्रहाचे वस्तुमान 14 g/cm3 आहे.

Alien Planet : या ग्रहाला TOI 4603b असे नाव देण्यात आले आहे

नवीन शोधलेला ग्रह TOI 4603 किंवा HD 245134 नावाच्या ताऱ्याभोवती फिरतो. NASA च्या Transiting Exoplanet Survey Satellite (TESS) ने सुरुवातीला याला तारा म्हटले. या तार्‍याजवळ वेगळ्या प्रकृतीचा दुसरा ग्रह असू शकतो, असे नासाने म्हटले होते. त्याला आता ग्रह म्हणून पुष्टी मिळाली आहे आणि त्याला TOI 4603b किंवा HD 245134b असे नाव देण्यात आले आहे.

Alien Planet : हा ग्रह पृथ्वीपासून ७३१ प्रकाशवर्षे अंतरावर..

हा ग्रह पृथ्वीपासून ७३१ प्रकाश-वर्षांच्या अंतरावर आहे आणि तो दर ७.२४ दिवसांनी त्याच्या जवळच्या ताऱ्याभोवती फिरतो. 1396 अंश सेल्सिअस तापमानासह हा ग्रह वेगाने गरम होत आहे.

Alien Planet : सूर्यमालेच्या बाहेर आहेत हजारो ग्रह

या ग्रहाचे वस्तुमान गुरूच्या वस्तुमानापेक्षा 11 ते 16 पट अधिक असल्याचे सांगितले जात आहे. शास्त्रज्ञ पृथ्वीच्या बाहेर जीवनाची शक्यता शोधत आहेत. आत्तापर्यंत, सूर्यमालेच्या बाहेर 5000 हून अधिक ग्रह सापडले आहेत, ज्यांचे स्वरूप भिन्न आहे आणि त्यांचे वातावरण आणि रचनाही भिन्न स्‍वरूपाची आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news