प्रवाशाने केला विमानाचा दरवाजा लॉक; पायलट चढला कॉकपिटच्या खिडकीतून | पुढारी

प्रवाशाने केला विमानाचा दरवाजा लॉक; पायलट चढला कॉकपिटच्या खिडकीतून

सॅन डिएगो : विमानातून उतरलेल्या शेवटच्या प्रवाशाने चुकून दरवाजा लॉक केल्याने विमानाच्या पायलटला पुन्हा विमानात शिरण्यासाठी बाहेरून कॉकपिटच्या खिडकीचे दार उघडून आत प्रवेश करावा लागल्याची अजब घटना अमेरिकेत घडली.

सॅन डिएगो विमानतळावर साऊथवेस्ट एअरलाईन्सचे विमान उतरले. विमानतळावर विमान उतरल्यावर प्रवाशांना बाय बाय करायला विमानाचे कर्मचारी बाहेर उभे राहतात, तसे कर्मचारी व पायलट बाहेर उभे राहिले. शेवटच्या प्रवाशाने उतरताना दार लोटून घेतले आणि ते लॉक झाले. हे लॉक दार उघडण्यासाठी पायलटने विमानाच्या कॉकपिटमध्ये बसणे आवश्यक असते. यामुळे विमानच लॉक झाल्याने पायलटला आत प्रवेश करता आला नाही. अखेर एक शिडी मागवून पायलटने कॉकपिटच्या खिडकीतून घुसत आत प्रवेश केला व पुन्हा दार उघडले.

Back to top button