Uganda Signs Anti-LGBTQ Bill : समलैंगिक संबध ठेवल्यास मृत्यूदंड! ‘या’ देशात कायद्याला मंजुरी

Uganda Signs Anti-LGBTQ Bill : समलैंगिक संबध ठेवल्यास मृत्यूदंड! ‘या’ देशात कायद्याला मंजुरी
Published on: 
Updated on: 

कम्पला (युगांडा); पुढारी ऑनलाईन : युगांडाचे अध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी देशातील कठोर LGBTQ विरोधी कायद्यांवर स्वाक्षरी केली आहे. त्यात समलैंगिकतेसाठी मृत्युदंडाच्या तरतुदीचाही समावेश आहे. युगांडाच्या सरकारने पाश्चात्य देशांकडून होणारा निषेध आणि देणगीदारांच्या निर्बंधांचा धोका पत्करून हा निर्णय घेतला आहे. ३० पेक्षा जास्त आफ्रिकन देशांप्रमाणेच युगांडामध्ये समलिंगी संबंध आधीच बेकायदेशीर आहेत. मात्र, या बंदीबाबत नवीन कायदा अधिक कडक करण्यात आला आहे. (Uganda Signs Anti-LGBTQ Bill)

वृत्तानुसार, नवीन समलैंगिकताविरोधी कायद्यात 'सिरियल ऑफेन्डर्स'साठी फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. यासोबतच समलैंगिक लैंगिक संबंधातून एचआयव्ही / एड्स सारख्या असाध्य रोगांचा प्रसार करण्यावरही कठोर कारवाई केली जाऊ शकते. याशिवाय समलैंगिकतेला प्रोत्साहन देणाऱ्यांना २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. युगांडाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या क्लेअर बायरुगाबा यांनी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. एलजीबीटीआयक्यू समुदाय, आमचे सहयोगी आणि संपूर्ण देशासाठी हा काळा आणि दुःखद दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. (Uganda Signs Anti-LGBTQ Bill)

युगांडाचे राष्ट्रपती समलैंगिकतेवर काय म्हणाले (Uganda Signs Anti-LGBTQ Bill)

ब्यारुगाबा आणि इतर कार्यकर्त्यांनी नवीन कायद्याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, ७८ वर्षांचे राष्ट्राध्यक्ष मुसेवेनी यांनी समलैंगिकतेला 'सामान्य पासून भटकने' असे म्हटले आहे. त्यांनी खासदारांना 'साम्राज्यवादी दबावाला' विरोध करण्याचे आवाहन केले. मुसेवेनी यांनी मार्चमध्ये मंजूर केलेले मूळ विधेयक खासदारांना परत पाठवले आणि काही तरतुदी शिथील करण्यास सांगितले. मात्र, ज्या प्रस्तावाला राष्ट्रपतींकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे, त्यात समलैंगिकतेविरोधात नरमाई दिसून येत नाही.

युगांडावर घातली जाऊ शकते बंदी

युगांडाला दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची विदेशी मदत मिळते हे सर्वांना ज्ञात आहे. आता त्याने समलैंगिकतेबाबत इतका कडक कायदा लागू केल्याने त्यांना निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. विधेयकाचे प्रायोजक असुमन बसलिरवा यांनी सांगितले की, कायद्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर संसदेच्या अध्यक्ष अनिता अमंग यांचा यूएस व्हिसा रद्द करण्यात आला. युगांडातील यूएस दूतावासाकडून त्वरित प्रतिक्रिया आली नाही. मार्चमध्ये मंजूर झालेल्या विधेयकाचा व्हाईट हाऊसनेही निषेध नोंदवल्याची माहिती आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news