Orange Cap 2023 : शुभमन गिल ठरला ‘ऑरेंज कॅप’चा मानकरी

Orange Cap 2023
Orange Cap 2023
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात टायटन्सचा सलामीवीर आणि स्टार फलंदाज शुभमन गिल याने आयपीएल २०२३ च्या यंदाच्या हंगामात अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने या हंगामात १७ सामने खेळत ८९० धावांत केल्या आहेत. यंदाच्या हंगामात त्याने सर्वाधिक धावा केल्याने तो 'ऑरेंज कॅप'चा मानकरी ठरला आहे. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्यात विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. दरम्यान, विराट कोहलीनंतर या यादीत शुभमन गिलचे नाव असणार आहे. (Orange Cap 2023)

आयपीएलच्या अंतिम सामन्यात त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरोधात २० चेंडूमध्ये ३९ धावा केल्या. रवींद्र जडेजाने त्याला बाद केले. शिवाय, शुभमन गिल ऑरेंज कॅप पटकावणारा सर्वांत युवा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या हंगामात त्याने ३ शतक आणि ४ अर्धशतक ठोकत सर्वाधिक ८९० धावा केल्या आहेत. याशिवाय गिल एका हंगामात सर्वाधिक चौकार लगावणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या हंगामात ८५ धावा केल्या आहेत. (Orange Cap 2023)

एका हंगामात जास्त धावा करणारे खेळाडू (Orange Cap 2023)

१. विराट कोहली – ९७३ धावा – २०१६
२. शुभमन गिल – ८९० धावा – २०२३
३. जोस बटलर – ८६३ धावा – २०२२

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news