Germany recession 2023 | युरोपीतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनीत मंदीचे वारे, युरो चलन गडगडले, जाणून घ्या कारण | पुढारी

Germany recession 2023 | युरोपीतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनीत मंदीचे वारे, युरो चलन गडगडले, जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाईन : युरोपातील सर्वात मोठी आणि जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असलेली जर्मनी मंदीत (Germany recession 2023) असल्याची पुष्टी झाली आहे. परिणामी यूरोपीयन संघ (Europe) राष्ट्रांचे अधिकृत चलन युरो (euro) गुरुवारी घसरले. तर अमेरिका डीफॉल्टबद्दल चिंता वाढल्यामुळे सेफ हेवन मालमत्ता म्हणून मागणी वाढल्याने डॉलर (U.S. dollar index) मजबूत झाला असून तो दोन महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे.

जर्मनीच्या सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या त्रैमासिक आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जर्मनीचा जीडीपी (GDP) ०.३ टक्के कमी झाला आहे. २०२२ च्या चौथ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान जर्मनीचा जीडीपी ०.५ टक्के कमी झाला होता. (Germany economy enters recession)

रेटिंग एजन्सी फिचच्या ताज्या रेटिंगमुळे चिंता वाढली आहे. ज्यात अमेरिकेचे “AAA” कर्ज रेटिंग नकारात्मक वॉच श्रेणीत ठेवण्यात आले आहे. अमेरिकेतील कर्ज मर्यादा वाढवण्यास सरकार आणि विरोधी पक्षांत सहमती झाली नसल्याने संभाव्य परिणामांचे हे संकेत आहेत. (Germany news)

सेफ हेवन मागणीचा अमेरिकी डॉलरला फायदा झाला. अमेरिकेत एका ठराविक तारखेपूर्वी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये कर्ज मर्यादा वाढविण्यावर सहमी होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे अमेरिकी ट्रेझरीने सरकारला सांगितले आहे की आता त्यांच्याकडे बिलांची रक्कम भरण्यासाठी पुरेशी रोकड शिल्लक नाही.

डॅन्स्के बँकेचे (Danske Bank) वरिष्ठ विश्लेषक स्टीफन मेलिन यांनी म्हटले आहे की, या आठवड्यात जोखीम कमी करण्याचा प्रयत्न आहे आणि यामुळे डॉलरला फायदा झाला आहे. दरम्यान, युरोपमधील अर्थव्यवस्था कोलमडल्याने युरो डॉलरच्या तुलनेत निचांकी पातळीवर गेला आहे. युरोपची अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याचे संकेत जर्मनीतून मिळाले आहेत. जेथे पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत थोडीशी घसरण झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२ मधील चौथ्या तिमाहीतील नकारात्मक वाढीनंतर जर्मनीची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने झुकली आहे. (Germany recession 2023)

“आम्ही या आठवड्यात काही वेगवेगळा क्रॉस-अटलांटिक मॅक्रो डेटा पाहिला आहे. यातून जर्मनीची अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे दिसते,” असे डॅन्स्के बँकेच्या मेलिन यांनी सांगितले.

युरो सुमारे ०.२ टक्के घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत युरोचे मुल्य १.०७१५ ($1.0715) डॉलरवर आले आहे. युरोची ही दोन महिन्यांतील निच्चांकी पातळी आहे. फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीच्या शक्यतेमुळे अमेरिकी डॉलर यावर्षी मजबूत झाला आहे. (Germany recession 2023)

हे ही वाचा :

Back to top button