पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा कोविडची लाट आली आहे. कोरोनोच्या XXB या नवीन व्हेरिएंटचा येथील लोकांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधील आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे. दरम्यान जूनमध्ये चीनमधील या नवीन कोविड व्हेरिएंटमुळे रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. जूनमध्ये आठवड्यात ६५ दशलक्ष (६ कोटी ५० लाख) लोकांना कोविड संक्रमण (China New Covid Variant) होऊ शकते, असे देखील एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे,असे वृत्त 'एनडीटिव्ही' ने दिले आहे.
कोविडच्या या नवीन विषाणूच्या लाटेबाबत चिनी अधिकारी आधीच सतर्क असल्याचे दिसत आहे. कोविडच्या या नवीन व्हेरिएंट संक्रमणाला सामोरे जाण्यासाठी चिनी अधिकारी देशातील नागरिकांना कोविड लसींचा (China New Covid Variant) आग्रह धरत आहेत. या संदर्भात असा अंदाज वर्तवला जात आहे की, जूनपर्यंत कोविडचा हा नवीन विषाणू संपूर्ण चीनमध्ये वेगाने पसरेल आणि त्या दरम्यान सुमारे ६५ दशलक्ष लोकांना याचे संक्रमण होईल; असा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे.
वॉशिंग्टन पोस्टच्या मते, येणारे वर्ष नवीन बदलांमुळे युनायटेड स्टेट्समध्ये संक्रमणांमध्ये वाढ झाली आहे. सार्वजनिक आरोग्य आणीबाणी ११ मे रोजी संपली आहे. तरी तज्ज्ञांनी असे घोषित केले गेले आहे की, नवीन प्रकारांमुळे आजारांची आणखी एक लाट येण्याची शक्यता (China New Covid Variant) नाकारता येत नाही.
येथील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी महामारी शास्त्रज्ञ झोंग नानशान यांनी सोमवारी (दि.२१) माध्यमांशी बोलताना सांगितले की, XBB ओमीक्रॉन सबव्हेरिएंटसाठी (XBB. 1.9.1, XBB. 1.5, आणि XBB. 1.16) दोन नवीन लसी लॉन्चसाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच झोंग पुढे म्हणाले, तीन ते चार इतर कोविड लसींना देखील लवकरच मान्यता दिली जाईल; असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
चीनने शून्य-कोविड धोरण संपविल्यानंतरही कोविड विषाणू संक्रमणाची सर्वात मोठी लाट असू शकते, असे म्हटले आहे. येथील अधिकारी दावा करतात की, सध्याची कोविड लाट ही कमी तीव्र असेल, परंतु सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांना याची भीती वाटते की, या कोविड लाटेच्या संक्रमणाचा सामना करण्यासाठी उपाययोजना न केल्यास, यामध्ये वृद्ध लोकांच्या मृत्यूच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असे देखील अहवालात स्पष्ट सांगितले आहे.