Gautam Adani | अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी पुन्हा टॉप २० मध्ये, जाणून घ्या मुकेश अंबानी कितव्या स्थानावर? | पुढारी

Gautam Adani | अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी पुन्हा टॉप २० मध्ये, जाणून घ्या मुकेश अंबानी कितव्या स्थानावर?

पुढारी ऑनलाईन : हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अडचणीत सापडलेले अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी (Adani group Chairman Gautam Adani) यांनी ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत (Bloomberg Billionaires Index) पुन्हा टॉप २० मध्ये आपले स्थान पुन्हा मिळवले आहे. मंगळवारी अदानी समुहातील सर्व १० कंपन्यांचे शेअर वधारले. यामुळे अदानी यांची संपत्ती ४.३८ अब्ज डॉलरनी वाढून ६४.२ अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये १८ व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांनी या यादीत उद्योजक झोंग शानशान आणि जॅकलिन मार्स यांना मागे टाकले आहे.

Bloomberg Billionaires Index च्या यादीत उद्योजक बर्नार्ड अर्नॉल्ट अव्वल स्थानी आहेत. तर एलन मस्क, जेफ बेझोस, बिल गेट्स हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. रिलायन्स इंड्रस्ट्रिजचे मुकेश अंबानी १३ व्या स्थानी आहेत.

अदानी यांच्याविरोधातील हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्यांची एकूण संपत्तीत मोठी घट झाली होती. यामुळे ३ फेब्रुवारी रोजी गौतम अदानी टॉप २० च्या यादीतून बाहेर गेले होते. ते सप्टेंबर २०२२ मध्ये १५४ अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले होते. अदानींनी (Gautam Adani) या वर्षाच्या सुरुवातीपासून ५६.४ अब्ज डॉलर गमावले आहेत.

राजीव जैन यांच्या GQG Partners ने अदानी एंटरप्रायझेसमधील त्यांचा हिस्सा मंगळवारी १० टक्के वाढवला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी होल्डिंग कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत सुमारे १९ टक्के वाढली. अदानी समूहातील इतर कंपन्यांनाही यामुळे सकारात्मक गती मिळाली आणि त्यांचे शेअर्स वधारले.

Bloomberg Billionaires Index

अदानी समूहाला दिलासा अन्…

नियामक व्यवस्था फोल ठरल्याचा निष्कर्ष अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात काढता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या न्या. सप्रे समितीने काढला आहे. अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने नेमलेल्या विशेषतज्ज्ञ समितीचा अहवाल गेल्या शुक्रवारी सार्वजनिक करण्यात आला. या अहवालानंतर अदानी समुहाला मोठा दिलासा मिळाला. अदानी समुहाने कुठलीही आर्थिक माहिती लपवली नसल्याचे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या १७३ पानी अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. अदानी समूहाच्या समभागाची सेबी ऑक्टोबर २०२० पासून तपास करीत आहे. पण अद्याप समूहाच्या बाजूने अथवा विरोधात कुठलेही निर्णायक पुरावे मिळाले नसल्याचे समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाल्याने पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये समूहाच्या शेअर्समध्ये मोठी अस्थिरता दिसून आली होती, असेदेखील अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button