PM Modi Australia Visit : ऑस्ट्रेलियात मोदींचे अभूतपूर्व स्वागत; दोन्ही देशांचे मैत्रीसंबंध होणार वृद्धींगत | पुढारी

PM Modi Australia Visit : ऑस्ट्रेलियात मोदींचे अभूतपूर्व स्वागत; दोन्ही देशांचे मैत्रीसंबंध होणार वृद्धींगत

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi Australia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ते रविवारी दाखल झाले तेव्हा त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. मोदी यांच्या स्वागतार्थ आयोजित ‘सिडनी डायस्पोरा’ या सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी ठरणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी अनेक भारतीयांनी उपस्थिती लावली. यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने विशेष तयारी केली. यामध्ये एका 91 वर्षीय ज्येष्ठ महिलेचाही समावेश आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या या महिलेच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले.

PM Modi Australia Visit : दोन्ही देशांचे व्यापारी संबंध होणार वृद्धींगत

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. त्यांच्या द्विपक्षीय बैठकीत, नेते सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराद्वारे दोन्ही देशांमधील व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नांसह व्यापार आणि गुंतवणुकीवर चर्चा करतील. मोदी यांचा हा दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन दौरा आहे. भारताने गेल्या वर्षी ऐतिहासिक व्यापार करार केला होता.

PM Modi Australia Visit : मोदींच्या स्वागत समारोहाचे यजमानपद भूषवण्याचा सन्मान वाटतो

मोदींच्या आगमनापूर्वी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “या वर्षाच्या सुरुवातीला भारतात अत्यंत उत्साही स्वागत झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत भेटीसाठी पंतप्रधान मोदींचे स्वागत करून यजमानपद भूषवण्याचा मला सन्मान वाटतो.”

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे होणाऱ्या सामुदायिक कार्यक्रमापूर्वी एका मनोरंजक विमानाच्या कंट्राईलद्वारे ‘वेलकम मोदी’ असे शब्दलेखन केले आहे.

PM Modi Australia Visit : सिडनी डायस्पोरा सांस्कृतिक कार्यक्रम

ऑस्ट्रेलियन सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियन भेटीदरम्यान, दोन्ही देशांचे पंतप्रधान ऑस्ट्रेलियातील गतिशील आणि वैविध्यपूर्ण भारतीय डायस्पोरा, “आमच्या बहुसांस्कृतिक समुदायाचा मुख्य भाग” साजरा करण्यासाठी सिडनी येथे सामुदायिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने ऑस्ट्रेलियातील अनेक भारतीय या कार्यक्रमात मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले. यासाठी ऑस्ट्रेलियन सकरारने विशेष तयारी केली आहे.

PM Modi Australia Visit : सिडनी डायस्पोरासाठी विशेष मोदी एअरवेज फ्लाइट

सिडनी डायस्पोरा कार्यक्रमासाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडून मोदी एअरवेज या विशेष चार्टर्ड फ्लाइटचे नियोजन करण्यात आले. संपूर्ण ऑस्ट्रेलियातून भारतीयांनी भरलेले विमान आज सकाळी सिडनी येथे डायप्सोरा कार्यक्रमासाठी दाखल झाले. ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, 177 लोकांनी मेलबर्न ते सिडनी या विशेष “मोदी एअरवेज” फ्लाइटचा भाग होण्यासाठी बुकिंग केले होते. त्यामध्ये 91 वर्षीय ज्येष्ठ महिला डॉ. नवमणी चंद्र बोस यांचा समावेश होता. त्या मेलबर्नहून सिडनी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या.

PM Modi Australia Visit : कोण आहेत डॉ. नवमणी चंद्र बोस?

फ्लाइटमधील प्रवाशांमध्ये 91 वर्षीय नवमणी चंद्र बोस या होत्या. तिच्यासोबत तिच्या मुलीने सांगितले की डॉ. नवमणी या एनएस चंद्र बोस यांच्या पत्नी आहेत. जे 1991 ते 1992 पर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि 1995 ते 1997 पर्यंत त्यांनी तामिळनाडू राज्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले होते.”मी त्यांची मुलगी आहे आणि नवमणी या चंद्रा बोस यांची पत्नी आहे जे 1995-1997 पर्यंत तामिळनाडूच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते,” असे ती म्हणाली.

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ती ऊर्जा आणि उत्कटतेने भरलेली होती आणि “मोदी एअरवेज” ने प्रवास करताना तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली, “आज खूप आनंद झाला आणि हा एक चांगला कार्यक्रम होणार आहे,” असे ‘मोदी एअरवेज’ या विशेष चार्टर्ड फ्लाइटने मेलबर्न तुल्लामरीन विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या ज्येष्ठ महिलेने सांगितले.

हे ही वाचा :

PM Modi’s visit of Papua New Guinea : चीनला चाप बसवण्यासाठी मोदींची रणनीती; काय आहे पापुआ न्यू गिनी भेटीचे महत्व

पंतप्रधान मोदी यांना फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

पंतप्रधान मोदींचे पापुआ न्‍यू निगीमध्‍ये भव्‍य स्‍वागत, पंतप्रधान मारापेंनी घेतले आशीर्वाद

Back to top button