पंतप्रधान मोदी यांना फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान | पुढारी

पंतप्रधान मोदी यांना फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी देशाचा ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जपानमधील जी ७ आणि क्वाड बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि.२१) पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. तेथे त्यांनी फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स को-ऑपरेशन (FIPIC) च्या तिसऱ्या शिखर परिषदेला हजेरी लावली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेऊन मैत्रीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. जागतिक नेता म्हणून भारताच्या या पावलांसाठी, फिजीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला.

दरम्यान, पॅसिफिक बेटीय देश रिपब्लिक ऑफ पलाऊचे अध्यक्ष सुरंगेल एस. व्हीप्स ज्युनियर यांनी पंतप्रधान मोदींना
इबाकल पुरस्कार प्रदान करण्यात आला. पलाऊ प्रजासत्ताकच्या FIPIC शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची भेट झाली.

हेही वाचा :

Back to top button