पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांत अनेक कंपन्यांनी नोकरकपात सुरू केली आहे. खर्च, बचत आणि महागाई या कारणास्तव ट्विटर, मेटा, अॅमेझॉन या सारख्या मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांनी देखील कर्मचारी कपात केली आहे. यांच्याच रांगेत वॉल्ट डिस्ने कंपनी देखिल आहे. कंपनीने यापूर्वी कर्मचारी कपातीचे संकेत दिले होते. सध्या डिस्नेने कंपनीचे सीईओ बॉब चापेक यांनाच कंपनीतून काढून टाकले आहे.
वॉल्ट डिस्ने कंपनी देखील बऱ्याच काळापासून तोट्याची तक्रार करत असल्याने, कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात करण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. या घटनांमुळे जभरातील महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये नोकरकपातीचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे.
रायटर्सच्या म्हणण्यानुसार, कंपनीने कंपनीचा व्यवसाय वाढून नफा देखील वाढावा यासाठी कंपनीचे सीईओ बॉब चापेक यांची हकालपट्टी करत त्यांच्या ठिकाणी बॉब इगर यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. यापूर्वी बॉब इगर यांनी २००५ मध्ये वॉल्ट डिस्ने कंपनीचे नेतृत्व केले होते. दरम्यान, त्यांच्या कारकिर्दीच्या १५ वर्षात डिस्ने कंपनीने मार्वल आणि फॉक्स यांसारख्या मनोरंजन कंपन्या आणि इतर व्यवसाय विकत घेतले होते.
बॉब इगर यांनी Disney+ streaming ही सेवाही सुरू करताना म्हत्त्वाची भूमिका बजावली होती. जी नंतर स्टार इंडियाच्या भागीदारीत Disney+ Hotstar म्हणून भारतातही घोषित करण्यात आली. वॉल्ट डिस्ने कंपनीचे नवनियुक्त सीईओ बॉब इगर यांच्या येण्याने कंपनीला उर्जितावस्था मिळणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
वॉल्ट डिस्ने ही दर्जेदार कार्टून बनवून बालकांचे मनोरंजन करणारी जगातील सगळ्यात मोठ्या कंपनींपैकी एक आहे. या कंपनीला देखील आर्थिक मंदीचा फटका बसत असल्याने, ही कंपनी देखील कर्मचारी कपातीच्या मार्गावर आहे. कंपनीने सीईओला काढून टाकत, कर्मचाऱ्यांनाही कपातीचा इशारा दिला आहे. वॉल्ट डिस्ने ही कंपनी हिवाळी सुट्टीनंतर मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांची कपात करणार असल्याचे संकेत कंपनीने दिले आहेत. वॉलस्ट्रीट र्जनलने याचा अहवाल प्रकाशित केला आहे.
हे ही वाचा :