Russia ban entry : रशियाची अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ‘बराक ओबामा’ यांच्यासह ‘५००’अमेरिकन लोकांना प्रवेश बंदी

Russia ban entry : रशियाची अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ‘बराक ओबामा’ यांच्यासह ‘५००’अमेरिकन लोकांना प्रवेश बंदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने अमेरिकेच्या ५०० जणांना रशियात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. या ५०० अमेरिकन नागरिकांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष 'बराक ओबामा' यांचाही समावेश आहे. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांना प्रतिसाद म्हणून रशियाने देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. असे सीएनएन या वृत्तवाहिनीने आज (दि.२०) सांगितले. (Russia ban entry )

तर रशियाच्या  परराष्ट्र व्यवहार विभागाने शुक्रवारी (दि.१९) सांगितले की, "जो बायडेन प्रशासनाने लादलेल्या रशियन विरोधी निर्बंधांना प्रतिसाद म्हणून" अमेरिकेच्या कार्यकारी शाखेच्या अनेक वरिष्ठ सदस्यांसह "५०० अमेरिकन लोकांना" देशात प्रवेश करण्यावर बंदी घालत आहे.

Russia ban entry : या लोकांना प्रवेश बंदी

रशियाने ५०० अमेरिकन नागरिकांवर प्रवेश बंदी घातली आहे. या यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या व्यतिरिक्त अमेरिकेचे माजी राजदूत जॉन हंट्समन, अनेक अमेरिकन सिनेटर्स, चार्ल्स क्यू ब्राउन जूनियर यांचाही समावेश आहे. प्रसिद्ध अमेरिकन लेट-नाइट टीव्ही शो होस्ट जिमी किमेल, कोलबर्ट आणि सेठ मेयर्स यांनाही रशियाने देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

सीएनएन या वृतवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की  ५०० जणांच्या यादीत सरकारी आणि कायदा अंमलबजावणी एजन्सीमधील लोकांचा देखील समावेश आहे.

वॉशिंग्टनने शिकण्याची वेळ

वॉशिंग्टन आणि मॉस्को यांच्यातील संबंध सध्याच्या काळात अत्यंत खालच्या पातळीवर असल्याने, रशियन मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात प्रतिबंधांचे समर्थन करत म्हटले आहे की, "वॉशिंग्टनने हे शिकण्याची वेळ आली आहे की रशियाविरुद्ध एकही शत्रुत्वाचा हल्ला करायचा नाही.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news