राजस्थानकरांची होणार गर्दीतून सुटका; पुणे-बिकानेर विशेष रेल्वे 30 पासून

राजस्थानकरांची होणार गर्दीतून सुटका; पुणे-बिकानेर विशेष रेल्वे 30 पासून

पुणे : येत्या 30 मे पासून रेल्वेच्या उत्तर-पश्चिम विभागाकडून पुणे ते बिकानेर साप्ताहिक विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आठवड्यातून एकच रेल्वेगाडी असलेल्या आणि त्याच रेल्वेगाडीत दाटीवाटीमध्ये बसून, पुण्यातून राजस्थानसाठी प्रवास करणार्‍या राजस्थानकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांची गर्दीतून सुटका झाली आहे.

स्थायिक असलेल्या राजस्थान -करांची गाडी दररोज असावी अशी मागणी आहे. पुणे-बिकानेर (क्र. 20476) ही गाडी 30 तारखेपासून दर मंगळवारी पुण्यातून रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. तर बिकानेरला दुसर्‍या दिवशी रात्री म्हणजेच बुधवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल.

तसेच, बिकानेर-पुणे (20475) ही गाडी दर सोमवारी स.7 वाजून10 मिनिटांनी सुटेल, तर पुण्याला दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. दरम्यान, ही गाडी वसई रोड, पालनपूर, मारवाड जंक्शन, भगत की कोठी, जोधपूर, मेरठ रोड, बिकानेर या ठिकाणी थांबा घेईल. या गाडीला 20 डबे असणार आहेत.

राजस्थानचे खासदार करणार पुण्यातून उद्घाटन

पुणे-बिकानेर ही गाडी पुण्यातून सुरू होणार आहे. त्या दिवशी राजस्थानमधील पाली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रेमप्रकाश चौधरी पुण्यात उपस्थित राहून या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

आम्ही मूळचे राजस्थानमधील आहोत. मात्र, पुण्यात स्थायिक आहे. आम्हाला नेहमीच राजस्थानला ये-जा करावी लागते. मात्र, आठवड्यातून एकच गाडी असल्याने खूपच 'वेटिंग' असते. ही नवी गाडी सुरू केल्याने आम्हाला दिलासा मिळाला खरा, पण ही गाडी दररोज असणे गरजेचे आहे.

                                         – प्रशांत डाबी, पुण्यात स्थायिक, राजस्थानचे रहिवासी.

ही गाडी सुरू केल्याने राजस्थानच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, राजस्थानला ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही गाडी आता साप्ताहिक न ठेवता रोज करावी.

                                      – हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news