अफगाणिस्तानमधील हिंदूकुश प्रदेशात ५.६ रिश्‍टर स्‍केलचा भूकंप | पुढारी

अफगाणिस्तानमधील हिंदूकुश प्रदेशात ५.६ रिश्‍टर स्‍केलचा भूकंप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अफगाणिस्‍तानमधील हिंदूकुश प्रदेश आज ( दि. ३) भूकंपाने हादरला. या भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्‍टर स्‍केल इतकी नोंदवली गेली आहे, अशी माहिती युरोपियन भूमध्‍य भूकंप विज्ञान केंद्राने (EMSC) दिली आहे.

अफगाणिस्तान आणि हिंदुकुश पर्वतरांगांच्या दक्षिण आशियातील मोठा प्रदेश आहे. हा प्रदेश विनाशकारी भूकंपांसाठी असुरक्षित आहेत. घरे, रुग्णालये आणि इतर इमारतींच्या निकृष्ट बांधकामामुळे त्यांना भूकंपात कोसळण्याचा धोका आहे.

अफगाणिस्तानच्या पर्वतरांगांमध्ये भूस्खलन सामान्य बाब आहे. २०१५ मध्ये अफगाणिस्‍तानच्‍या ईशान्य भागात झालेल्‍या भूकंपात अफगाणिस्तान आणि शेजारील उत्तर पाकिस्तानमध्ये २०० हून अधिक नागरिक ठार झाले होते. २००२ मध्ये ६.१ रिश्‍टर स्‍केलच्‍या भूकंपात उत्तर अफगाणिस्तानात सुमारे एक हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. १९९८ मध्ये अफगाणिस्तानच्या दुर्गम ईशान्य भागात झालेल्‍या शक्‍तीशाली भूकंपात सुमारे ४,५०० लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा :

 

 

Back to top button