पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील खवय्यांमध्ये लाेकप्रिय असणार्या 'मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया' (MasterChef Australia) शोचे परीक्षक जॉक झोनफ्रिलो (Jock Zonfrillo) यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबाने सोमवारी (दि. १ मे) याबाबतची माहिती दिली. (MasterChef Jock Zonfrillo, judge on MasterChef Australia)
'द गार्डियन'ने दिलेल्या वृत्तानुसार, जॉक झोनफ्रिलो (Award-winning chef) यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र त्यांचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे व्हिक्टोरिया पोलिसांनी स्पष्ट केले आहे. झोनफ्रिलो यांच्या मृत्यूचा अहवाल कोरोनर कार्यालयाकडून तयार केला जाईल अशी माहिती देखील व्हिक्टोरिया पोलिसांनी दिली आहे. (MasterChef Jock Zonfrillo)
जॉक झोनफ्रिलो यांच्या मृत्यूची बातमी मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया टिव्ही शोच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही शेअर करण्यात आली आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, "मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया कुटुंबातील एक लाडका सदस्य जॉक झोनफ्रिलो यांच्या अचानक निधनामुळे नेटवर्क 10 आणि एन्डेमोल शाइन ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. जॉक यांचे मेलबर्नमध्ये निधन झाले आहे. मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचा नवा सीझन या आठवड्यात प्रसारित होणार नाही अशी माहिती या टिव्ही शोमार्फत देण्यात आली आहे. (judge on MasterChef Australia)
हेही वाचा