Met Gala 2023 : रेड कार्पेटवर आलियाची 'पांढरी जादू'; सुंदरतेने वेधले लक्ष | पुढारी

Met Gala 2023 : रेड कार्पेटवर आलियाची 'पांढरी जादू'; सुंदरतेने वेधले लक्ष

पुढारी ऑनलाईन : मेट गाला 2023, जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटपैकी एक, 1 मे पासून सुरू होत आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. शोच्या रेड कार्पेटवरील तिचे फोटो सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला. बहिण शाहीन भट्ट स्वतःला तीच्या कौतुकापासून रोखू शकली नाही आणि तिने आलियाला ‘एंजेल’ म्हटले.

मेट गाला कार्यक्रमासाठी आलिया भट्टने पांढऱ्या मोत्यांचा स्लीव्हलेस गाऊन निवडला. यासोबत तिने कमीत कमी दागिने घातले होते. हातात हातमोजे घातले होते, ज्‍याने तीचा लूक पूर्ण झाला.

आलिया भट्टची बहीण शाहीन भट्टने या कार्यक्रमातील अभिनेत्रीचे काही फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एंजल (परी).’ या सोबतच पांढऱ्या हृदयासह एक इमोजीही तयार करण्यात आला आहे. या पोस्टवर चाहत्यांनीही भरपूर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ‘गर्वाचा क्षण.’

यापूर्वी आलियाने तिच्या लूकची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. तिने मेट गाला आउटफिटमधला एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे. आणि त्यावर लिहिले होते, ‘आणि आम्ही तयार आहोत.’

यावर्षी मेट गाला न्यूयॉर्क शहरात आयोजित करण्यात आला आहे. आलिया व्यतिरिक्त, प्रियांका चोप्रा, किम कार्दशियन, केंडल जेनर, बिली इलिश, रिहाना, गिगी हदीद, रोज आणि नाओमी कॅम्पबेल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आपल्या सौंदर्याची झलक दाखवत आहेत.

या चित्रपटांमध्ये आलिया दिसणार आहे

आलिया भट्टच्या आगामी चित्रपटां विषयी बोलायचे झाल्‍यास, आलिया लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ असे त्या चित्रपटाचे नाव असून, तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोफी ओकोनेडो, मॅथियास श्वेघोफर आणि जिंग लुसी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या शिवाय त्याच्याकडे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत. फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्ये ती कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत दिसणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button