Abu Hussein al-Qurayshi : सीरियामध्ये इसिसचा म्होरक्या कुरैशी ठार; तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांची माहिती

Abu Hussein al-Qurayshi : सीरियामध्ये इसिसचा म्होरक्या कुरैशी ठार; तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांची माहिती

अंकारा; वृत्तसंस्था : सीरियामध्ये राबवलेल्या एका ऑपरेशनमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू हुसैन अल कुरैशी याचा खात्मा तर्कीच्या इंटेलिजेन्स एजन्सीने केला आहे. याबाबतची माहिती खुद्द तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयम एर्दोगान यांनी दिली आहे. (Abu Hussein al-Qurayshi)

एका मुलाखतीत एर्दोगान यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून तुर्कीची इंटेलिजेन्स एजन्सी कुरैशीचा शोध घेत होती. सीरियातील जिंदारिस गावात कुरैशीला ठार केले असल्याचे सीरियाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले. (Abu Hussein al-Qurayshi)

कुरैशी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इसिसचा म्होरक्या झाला होता. तुर्की इंटेलिजेन्स एजन्सीकडून एका मदरशांमध्ये ऑपरेशन राबवले. हे ऑपरेशन सुमारे एका तास चालले आणि त्यानंतर मोठा धमाका झाला. यामध्ये कुरैशी मारला गेला असल्याची माहिती जिंदारिस गावातील लोकांनी दिली. मात्र, सीरियाच्या लष्कराने याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.  (Abu Hussein al-Qurayshi)

तुर्कीच्या या ऑपरेशनपूर्वी अमेरिकेनेही उत्तर सीरियामध्ये एक ऑपरेशन राबवून इसिसचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले होते. दुसरीकडे 16 एप्रिल रोजी इसिसच्या दहशतवाद्यांनी 41 लोकांना मारले होत. यामध्ये 24 सामान्य नागरिकांचा समावेश होता.

2017 मध्ये अमेरिकेला दंड

2017 मध्ये इसिसच्या हल्ल्यात अनेक इराणी लोक मारले गेले होते. त्यामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अमेरिकेच्या अनेक अधिकार्‍यांना कोर्टने 25 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. इसिसच्या निर्मितीस अमेरिका जबाबदार असल्याचे त्यावेळी कोर्टाने म्हटले होते.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news