Joe Biden : 80 वर्षीय जो बायडेन पुन्हा लढवणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक! | पुढारी

Joe Biden : 80 वर्षीय जो बायडेन पुन्हा लढवणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायदेन यांनी मंगळवारी 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते सध्या 80 वर्षांचे आहेत. व्हाईट हाऊसबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनचा व्हिडिओ ट्विट करून बायडेन यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. व्हिडिओमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस याही दिसत आहेत.

बायडेन हे पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात असे संकेत गेल्या काही महिन्यांपासून मिळत होते, अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाला. मंगळवारी बायडेन यांनी औपचारिकपणे आपल्या नावाची घोषणा करून पुढील निवडणूक मोहीमेला दणक्यात सुरुवात केली आहे. अमेरिकन लोकांसाठी जे मिशन मी हाती घेतले आहे, ते पुर्णत्वास नेण्यासाठी आणखी चार वर्षे सत्ता द्यावी असे आव्हान त्यांनी केले.

यापूर्वी बायडेन यांनी 25 एप्रिल 2019 रोजी पहिल्यांदा त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून सत्तापालट केला होता. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करत बायडेन यांनी चार वर्षांनी म्हणजे 2023 मध्ये 25 एप्रिल हाच दिवस निवडून 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आपल्या नावाची घोषण केली आहे. 15 एप्रिल रोजी त्यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक लढवण्याचे संकेतही दिले होते.

बायडेन काय म्हणाले?

ट्विटमध्ये बायडेन म्हणतात की, प्रत्येक पिढीला अशी संधी असते जेव्हा त्यांना लोकशाही वाचवण्यासाठी उभे राहावे लागते. हा लढा मूलभूत स्वातंत्र्यासाठीचा आहे. म्हणूनच मी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढवणार आहे. आमच्या मिशनमध्ये सामील व्हा,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

Back to top button