पाकिस्‍तानमध्‍ये पुन्‍हा येणार ‘लष्‍करराज’! माजी पंतप्रधानांनी दिला इशारा

पाकिस्‍तानमध्‍ये पुन्‍हा येणार ‘लष्‍करराज’! माजी पंतप्रधानांनी दिला इशारा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानवर आलेले आर्थिक आणि राजकीय संकट पाहात देशातील सत्ता लवकर लष्‍कर ताब्‍यात घेईल, असा इशारा माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्‍बासी (Former PM Abbasi) यांनी दिला आहे. यापूर्वी लष्‍कराने खूप कमी वेळा सत्तेत हस्‍तक्षेप केला आहे. मात्र आता परिस्‍थिती चिघळली असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

मागील ७५ वर्षांच्‍याअधिक काळात पाकिस्‍तानमध्‍ये लष्‍कराने अनेक वेळा सत्तापालट करत आपलं वर्चस्‍व दाखवले आहे. याबाबत एका मुलाखतीमध्‍ये विचारले असता सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे वरिष्ठ नेते शाहिद खाकान अब्बासी म्हणाले की, सध्‍या पाकिस्‍तानवर मोठे आर्थिक आणि राजकीय संकट आहे. देशातील व्‍यवस्‍था बिघडली तर मार्शल लॉ लागू होऊ शकतो. यापूर्वी पाकिस्तानची एवढी भीषण आर्थिक आणि राजकीय स्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. केवळ अत्यंत दुर्मिळ परिस्थितीत सैन्याने सत्ता हस्तगत केली आहे. सध्‍याही अशीच परिस्‍थिती आहे, असा दावा त्‍यांनी केला.

लष्‍कराने सत्ता ताब्‍यात घेतल्‍यास परिस्‍थिती आणखी बिघडेल

अब्बासी यांनी इशारा दिला की, जर समाज आणि सरकारी संस्थांमधील संघर्ष खूप खोलवर गेला तर अशा परिस्थितीत लष्करही पाऊल उचलू शकते. अनेक देशांमध्ये असे घडले आहे की जेव्हा राजकीय आणि घटनात्मक व्यवस्था अपयशी ठरते, तेव्हा घटनाबाह्य उपाय केले जातात. अशा काळात पाकिस्‍तानमध्‍ये लष्कर मार्शल लॉ लागू करण्याच्या पर्यायावर विचार करत नाही कारण लष्कराने सत्ता हाती घेतल्यास परिस्थिती आणखी बिघडेल, असा दावाही त्‍यांनी केला.

Former PM Abbasi : राजकीय व्यवस्था हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे

राजकीय व्यवस्था हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचे या वेळी अब्बासी म्हणाले. १२ महिन्‍यांपूर्वी इम्रान खान यांचे सत्ता जावून नवे सरकार सत्तेत आले; पण हे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. देशासमोर मोठे आर्थिक संकट आहे. त्‍यामुळे आता लष्‍कर सत्तातरांचा निर्णय घेवू शकते. मात्र देशाच्‍या विकासासाठी राजकीय व्‍यवस्‍था हाच एकमेव मार्ग आहे, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

पाकिस्‍तान गंभीर आर्थिक संकटाने ग्रासला

पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाने ग्रासला आहे आणि उच्च बाह्य कर्ज, कमकुवत चलन आणि वाढत्या महागाईने त्रस्त आहे. पाकिस्तानच्या परकीय चलनाचा साठा चार अब्ज डॉलरवर घसरला आहे, असे देशाच्या केंद्रीय बँकेने गेल्या आठवड्यात सांगितले. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत अत्यंत आवश्यक असलेल्या बेलआउटसाठी बोलणी करत आहे परंतु तरीही त्यासाठी संघर्ष करत आहे. USD १.१ बिलियन बेलआउट पॅकेजचे उद्दिष्ट देशाला दिवाळखोर होण्यापासून रोखणे आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news