

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाळीव कुत्रा दारुच्या आहारी गेल्याचा दुर्मिळ प्रकार ब्रिटनमध्ये घडला आहे. कुत्राचा मालक हा दारुच्या व्यसनाचा आहारी गेला होता. मालक झोपी गेल्यानंतर त्याच्या ग्लासमध्ये ठेवलेली दारू कुत्रा पित असे. अखेर व्यसन सोडविण्यासाठी संबंधित कुत्र्यावर व्यसनमुक्ती केंद्रात उपचार करण्यात आले. उपचारानंतर तो पूर्ण बरा झाला असून, दारुच्या व्यसनातून मुक्त झालेला तो जगातील पहिला कुत्रा ठरला आहे, असे वृत्त 'न्यूजवीक'ने दिले आहे. ( Alcoholic dog )
प्राणी कल्याण चॅरिटीच्या फेसबुक पेजवरील माहितीनुसार, मालकाचा मृत्यूनंतर दोन कुत्र्यांना डेव्हन येथील वुडसाइड अॅनिमल रेस्क्यू ट्रस्टकडे सोपविण्यात आले. अति मद्यप्राशनामुळे ते गंभीरपणे आजारी होते. उपचारावेळी दोघांपैकी एका कुत्र्याचा मृत्यू झाला. कोको दारूच्या आहारी केला होता. त्याला झटके येऊ लागले. चोवीस तास काळजी घेणे आवश्यक होते. त्याला धोक्यातून बाहेर काढण्यासाठी त्याला चार आठवडे बेशुद्ध ठेवावे लागले."
ट्रस्टला दारुच्या आहारी गेलेले कुत्रे मिळणे ही अत्यंत असामान्य घटना आहे. प्रदीर्घ उपचारानंतर कोको आता बरे होण्याच्या मार्गावर आहे. तरीही तो काही वेळा खूप चिंताग्रस्त राहतो. कोकोला मुख्य कुत्र्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. ट्रस्टच्या डनरोमिन युनिटमध्ये घरगुती वातावरणात त्याच्यावर उपचार केले गेले. असेही ट्रस्टने म्हटले आहे. मालकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांना अल्कोहोलयुक्त पेयांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे, असे आवाहनही ट्रस्टने केले आहे.
हेही वाचा :