US-Canada border : अमेरिका-कॅनडा सीमेजवळ भारतीय कुटुंबासह ८ जणांचे मृतदेह सापडले | पुढारी

US-Canada border : अमेरिका-कॅनडा सीमेजवळ भारतीय कुटुंबासह ८ जणांचे मृतदेह सापडले

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिका-कॅनडा सीमेजवळ एका  भारतीय कुटूंबासह आठजणांचा मृतदेह सापडल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघड झाला आहे. सर्वजण कवेसास्नेजवळ बेकायदेशीरपणे सेंट लॉरेन्स नदी ओलांडून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करत असावेत, असा संशय व्‍यक्‍त होत आहे.

या प्रकरणी स्‍थानिक पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सापडलेल्‍या मृतदेहामध्ये सहा प्रौढ आणि दोन मुलांचा समावेश आहे.  दोन मुलांपैकी  एकाकडे  कॅनडाचा पासपोर्ट होता. मृतदेह दोन कुटुंबातील आहे. यातील एक कुटूंब भारतीय तर दुसरे रोमानियन नागरिक आहेत. हे दोन्ही कुटूंब अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करत होते. (US-Canada border)

वादळामुळे दुर्घटना घडू शकते

 आठही मृतदेह नदीकाठच्या दलदलीत सापडले. या सर्वांची ओळखपत्र अद्याप जाहीर करण्‍यात आलेली नाही. पोलिस उपप्रमुख ली-ॲन ओ’ब्रायन म्हणाले की, वादळामुळे या भागात जोरदार वारे आणि त्‍यानंतरच्‍या थंडीमुळे ही दुर्घटना घडली असावी. नदीतून जलप्रवासासाठी ही अयोग्‍य वेळ हेती. तसेच वापरण्‍यात आलेली बोटही सदोष असावी. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

कॅनडाच्‍या पंतप्रधानांनी व्‍यक्‍त केला शोक 

या दुर्घटनेवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी शोक व्‍यक्‍त केला आहे.दोन कुटुंबांमध्ये काय घडले याबद्दल अनेक प्रश्न आहेत.  ही एक हृदयद्रावक परिस्थिती आहे, विशेषत: या दुर्घटनेत लहान मुलाचा बळी गेला आहे. या दुर्घटनेमागील कारणांचा शोध सुरु असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

US-Canada border : वारंवार घटना

अक्वेसास्ने पोलिसांचे म्हणणे आहे की जानेवारीपासून मोहॉक प्रदेशातून कॅनडा किंवा अमेरिकेत बेकायदेशीर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांबाबत तब्बल ४८ घटना घडल्या आहेत. त्यापैकी बहुतांश भारतीय किंवा रोमानियन वंशाचे आहेत. जानेवारी २०२२ मध्ये कॅनडा-अमेरिका सीमेजवळ मॅनिटोबा येथे एका बाळासह चार भारतीयांचे मृतदेह गोठलेल्या स्थितीत आढळले होते. एप्रिल २०२२ मध्ये अक्वेसास्ने मोहॉकमधून जाणार्‍या सेंट रेगिस नदीत बुडणाऱ्या बोटीतून सहा भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली होती. एप्रिल २०२२ मध्ये अक्वेसास्ने मोहॉक टेरिटरीमधून जाणाऱ्या सेंट रेगिस नदीत बुडणाऱ्या बोटीतून सहा भारतीय नागरिकांना वाचवण्यात आले होते.

हेही वाचा 

Back to top button