पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्थिक संकटात सापडलेली अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेची अखेर विक्री झाली आहे. ही बँक फर्स्ट सिटिझन्स बँकने खरेदी केली आहे. फर्स्ट सिटिझन्स बँक आणि ट्रस्ट कंपनीने अमेरिकेतील प्रशासनाने जप्त केलेली सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) खरेदी करण्यास सहमती दर्शविल्यानंतर हा व्यवहार झाला आहे. दरम्यान, सोमवारी फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) ने सिलिकॉन व्हॅली ब्रिज बँकेच्या सर्व ठेवी आणि कर्जे यांचा ताबा फर्स्ट-सिटिझन्स बँक आणि ट्रस्टला दिला. यामुळे सिलिकॉन व्हॅली ब्रिज बँक, नॅशनल असोसिएशनचे ठेवीदार आता आपोआप फर्स्ट-सिटिझन्स बँक आणि ट्रस्ट कंपनीचे ठेवीदार बनले. (First Citizens- Silicon Valley Bank Deal)
"फर्स्ट-सिटिझन्स बँक अँड ट्रस्ट कंपनीने गृहीत धरलेल्या सर्व ठेवींचा विमा FDIC द्वारे काढलेल्या विमा मर्यादेपर्यंत कायम राहील," असे सरकारी कॉर्पोरेशनने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. First Citizens Bank ही Raleigh मुख्यालय असलेल्या First Citizens BankShares, Inc ची उपकंपनी आहे. सिलिकॉन व्हॅलीच्या शेअर कव्हरेजसह संपूर्ण बँक फर्स्ट सिटिझन्सने खरेदी केली गेली आहे. फर्स्ट सिटिझन्स बँकेकडे सुमारे १०९ अब्ज डॉलर मालमत्ता आणि ८९.४ अब्ज डॉलरच्या एकूण ठेवी आहेत. १० मार्च २०२३ पर्यंत सिलिकॉन व्हॅली बँके (SVB) ची एकूण मालमत्ता अंदाजे १६७ अब्ज डॉलर असून एकूण ठेवी सुमारे ११९ अब्ज डॉलरच्या आहेत. फर्स्ट सिटिझन्ससोबतच्या व्यवहारात SVB NA's ची सुमारे ७२ अब्ज डॉलर मालमत्ता १६.५ अब्ज डॉलर सवलतीच्या दरात खरेदी करण्यात आली आहे.
अमेरिकेत व्यापाच्या बाबतीत १६ वी सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या सिलिकॉन व्हॅली बँकेला टाळे ठोकण्याचे आदेश कॅलिफोर्नियातील डीएफपीआय (डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशन) या नियामक प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. बँकेची मूळ कंपनी असलेल्या एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपचे समभाग ९ मार्च रोजी जवळपास ६० टक्क्यांनी घसरल्यानंतर बँक बुडीत निघाली होती. अमेरिकेवर याआधीही २००८ मध्ये मोठे आर्थिक संकट ओढवले होते. त्यानंतर अमेरिकेच्या इतिहासातील आर्थिक पडझडीची ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे. (First Citizens- Silicon Valley Bank Deal)
१) एसव्हीबीने वारेमाप बाँडस् खरेदी केले, त्यात मोठा तोटा झाला.
२) २०२३ मध्ये अमेरिकन मध्यवर्ती बँकेने टेक कंपन्यांसाठी व्याजदरात वाढ केली.
यापूर्वी २९ सप्टेंबर २००८ रोजी जेव्हा अमेरिकन बाजार खुला झाला तेव्हा घसरणीचे सारे उच्चांक मोडीत निघाले होते. समभागांतील
४८ टक्के घसरणीसह लीमॅन ब्रदर्स कंपनी दिवाळखोर ठरल्याचा हा परिणाम होता. मंदीसाठी अमेरिकेची दारे या घटनेने सताड उघडी केली होती. अॅपलपासून ते जेपी मॉर्गनपर्यंत अमेरिकेतील सार्या बड्या कंपन्यांचे समभाग तेव्हा कोसळले होते.
हे ही वाचा :