Gurudwara in US : अमेरिकेतील गुरूद्वारमध्ये गोळीबार, दोघे गंभीर जखमी
पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅक्रामेंटो काउंटीमध्ये रविवारी (दि.२६) रात्री उशिरा एका गुरुद्वारामध्ये गोळीबार झाला. येथे तिघांमध्ये गोळीबार झाला. यामधील दोघांची प्रकृती गंभीर आहे. काउंटी शेरीफच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार हे तिघेही एकमेकांना परिचित होते. याप्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती येथील पोलिसांनी दिली आहे.
काय आहे घटना?
सॅक्रामेंटो काउंटी शेरीफचे प्रवक्ता अमर गांधी म्हणाले की, गोळीबाराचा द्वेषाच्या गुन्ह्याशी काही संबंध नाही. कारण या गोळीबारात सहभागी असलेले तिघेजण एकमेकांना ओळखत होते. यापूर्वी काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर एका संशयिताने आपली बंदूक बाहेर काढली आणि भांडणात सहभागी असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या मित्रावर गोळी झाडली. यानंतर गोळी न लागलेल्या व्यक्तीने बंदूक काढून पहिल्या शूटरवर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

