मंत्रालय परिसरात आठ राजकीय पक्षांना मिळणार नवी कार्यालये

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कुलाबा -वांद्रे- सिप्झ मेट्रो ३ प्रकल्पासाठी मंत्रालय परिसरातून स्थलांतर झालेल्या आठ राजकीय पक्षांना आणि सरकारी विभागांना त्याच ठिकाणी नवी कार्यालये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारिप बहुजन महासंघ, शेकाप, आरपीआय (कवाडे गट), आरपीआय डेमोक्रेटिक आणि समाजवादी पार्टी आदी पक्षांचा समावेश आहे.

बांधकाम करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रालय परिसरात या राजकीय पक्षांची कार्यालये होती. मेट्रो ३ या प्रकल्पासाठी तेथील जागा २०१५ साली ताब्यात घेण्यात आली. या पक्षांना बेलार्ड पिअर येथील ठाकरसी इमारतीत तात्पुरती पर्यायी जागा देण्यात आली होती. या जागेचे भाडे कोर्पोरेशन भरत आहे.

राजकीय पक्षांसोबतच या परिसरातील २७ सरकारी कार्यालयांचेही स्थलांतर करण्यात आले होते. त्यांनाही दक्षिण मुंबईत पर्यायी जागा देण्यात आली होती. सरकारी कार्यालयांनाही आता नवी कार्यालये मिळणार आहेत. संपादित जागेवर दोन उत्तुंग इमारती बांधल्या जाणार असून त्यापैकी एका इमारतीत या कार्यालयांना जागा मिळेल. तर दुसरी इमारत ही व्यवसायिक असेल. या इमारतीतील गाळे बाजारभावाने विकून कॉर्पोरेशनला महसूल मिळवता येईल. कार्यालयांचे स्थलांतर आणि पर्यायी जागेचे भाडे यापोटी २०१६ सालापासून कॉर्पोरेशनला शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.

नवीन बांधकामासाठी १ लाख १३ हजार ५०० चौ. फू. जागा उपलब्ध होणार आहे. या जागेचे मुल्यांकन केल्यास सुमारे ४२६ कोटी ९८ लाख इतकी रक्कम राज्य सरकारचा हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीत समायोजित केला जाणार आहे. ही जागा सीआरझेड अंतर्गत येत असल्यास जागेचा प्रत्यक्ष वापर सुरु करण्याआधी एमसीझेडएमची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news