इम्रान खान यांना शरण येण्याचे आदेश | पुढारी

इम्रान खान यांना शरण येण्याचे आदेश

इस्लामाबाद; वृत्तसंस्था :  तब्बल 80 गुन्हे नावावर नोंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आत्मसमर्पण करण्याचे आदेश गुरुवारी दिले. खान यांच्याविरुद्ध बजावण्यात आलेले अटक वॉरंट रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी, आता पोलिस शांत बसू शकत नाहीत, अशा शब्दांत न्यायालयाने आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

न्यायालयात हजर राहण्यासाठी इम्रान यांना अटक करणे आवश्यक आहे का, असा सवाल त्यांचे वकील ख्वाजा हरीस अहमद यांनी केला. यावर उत्तर देताना न्यायाधीश जफर इक्बाल म्हणाले की, इम्रान यांनी न्यायालयात हजर राहावे, अशी आमची इच्छा आहे. खान यांना अटकेपासून वाचवायचे असेल, तर त्यांनी न्यायालयात येऊन आत्मसमर्पण करावे.

सतत वादाच्या भोवर्‍यात

खान यांच्यावर आतापर्यंत एकूण 80 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावर तोषखान्यात जमा झालेल्या भेटवस्तू स्वस्तात खरेदी करून जास्त किमतीत विकल्याचा आरोप आहे. याबाबत पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्यांना 5 वर्षांसाठी अपात्र घोषित केले आहे. त्यांचे संसद सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

Back to top button