इम्रान खान यांना कोर्टाकडून तात्पुरता दिलासा | पुढारी

इम्रान खान यांना कोर्टाकडून तात्पुरता दिलासा

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना कार्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. बलुचिस्तान उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.१०) त्यांच्याविरूद्ध खटला दाखल करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट दोन आठवड्यांसाठी कोर्टाने स्थगित केले आहे.

राज्यसंस्थांविरुद्ध जनतेला भडकावण्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने इम्रान खान यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार इम्रान खान यांना अटक करण्यासाठी क्वेटा पोलिसांचे पथक लाहोरमध्ये दाखल झाली होती. यानंतर बिजली घर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानंतर क्वेट्टा न्यायदंडाधिकारी यांनी इम्रान खान यांना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. राष्ट्रीय संस्थांना बदनाम केल्याप्रकरणी खान यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता.

अब्दुल खलील करक नावाच्या एका नागरिकाच्या तक्रारीवरून बलुचिस्तान पोलिसांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. क्वेटा येथील स्थानिक न्यायालयाने इम्रान खान यांच्याविरूद्ध पाकिस्तान दंड संहिता (PPC) आणि इलेक्ट्रॉनिक गुन्हे प्रतिबंधक कायदा, 2016 (PECA) च्या अनेक कलमांखाली दाखल केलेल्या गुन्हासंदर्भात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. मात्र यासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलल्याने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तात्पुरता का होईना, पण दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा:

Back to top button