Jammu and Kashmir : पुंछमध्ये २ कोटींच्या रोकडसह अमली पदार्थ जप्त | पुढारी

Jammu and Kashmir : पुंछमध्ये २ कोटींच्या रोकडसह अमली पदार्थ जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय लष्कराच्या जवानांनी पूंछ मधील मोहम्मद रफीक याच्या घरातून २ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे भारतीय आणि विदेशी चलन, गंजलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि सुमारे ७ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत.  (Jammu and Kashmir)

 मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफिकच्या घरातून रोख रक्कम आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अंदाजे २ कोटी, ३० लाख, ९३ हजार, ५७० रुपये  भारतीय चलन जप्त करण्यात आले आहे. तर परकीय चलन (अमेरिकन डॉलर)  १५००० डॉलर (सुमारे १२,३०,००० रुपये) जप्त करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण वसूल केलेली रक्कम रु. २, ४३, २३, ५७० (२ कोटी, ४३ लाख, २३ हजार, ५७०) आहे. यासोबतच आरोपीच्या घरातून भारतीय लष्कराच्या जवानांना गंजलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि ७ किलोपर्यंतचे संशयित अंमली पदार्थही मिळाले आहेत.

हेही वाचा 

Back to top button