Brain-eating amoeba | नळाचे पाणी वापरताय! मेंदू खाणाऱ्या अमिबाने एकाचा बळी, जाणून घ्या लक्षणे

Brain-eating amoeba | नळाचे पाणी वापरताय! मेंदू खाणाऱ्या अमिबाने एकाचा बळी, जाणून घ्या लक्षणे
Published on
Updated on

फ्लोरिडा : पुढारी ऑनलाईन; मेंदू खाणाऱ्या अमिबाचा (‍Brain-eating amoeba) संसर्ग झाल्याची पहिली घटना दक्षिण कोरियामध्ये आढळून आला होती. आता मेंदू खाणाऱ्या अमिबा संसर्गामुळे अमेरिकेच्या फ्लोरिडातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याला अमिबा नेग्लेरिया फौलेरीची लागण झाली होती. "नळाच्या पाण्याद्वारे नासिका मार्ग स्वच्छ धुण्याच्या ((sinus rinse practices) पद्धतींमुळे अमिबाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे." असे शार्लोट काउंटीमधील फ्लोरिडा डिपार्टमेंट ऑफ हेल्थने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. लोकांना या संसर्गाबद्दल सतर्क रहावे यासाठी नुकतीच हे बुलेटिन जारी करण्यात आले होते.

आरोग्य विभागाने गुरुवारी पुष्टी केली की अमिबा संक्रमित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि आरोग्य अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. "या संसर्गाची परिस्थिती समजून घेण्यासाठी त्याची महामारीविज्ञान तपासणी केली जात आहे. आम्ही पुष्टी करू शकतो की अमिबा संसर्गामुळे दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण गोपनियतेचा भाग असून रुग्णाविषयी माहिती देऊ शकत नाही," असे फ्लोरिडा आरोग्य विभागाचे प्रेस सेक्रेटरीजे जे विल्यम्स यांनी ईमेलद्वारे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संसर्ग यामुळे होतो

नेग्लेरिया फौलेरीचा संसर्ग अमिबा संक्रमित दूषित पाणी नाकातून शरीरात गेल्यानंतरच होऊ शकतो." असेही त्यात म्हटले आहे. नाक स्वच्छ करताना केवळ डिस्टिल्ड अथवा निर्जंतुक पाण्याचा वापर करा. नळाचे पाणी कमीतकमी एक मिनिट उकळले पाहिजे आणि नाक धुण्यासाठी ते वापरण्यापूर्वी थंड केले पाहिजे, असा सावधानतेचा इशारा शार्लोट काउंटीमधील फ्लोरिडा आरोग्य विभागाने रहिवाशांना दिला आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, निर्जंतुकीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा नाक धुण्यासाठी वापरणे करणे सुरक्षित नाही. कारण ते पुरेसे फिल्टर केलेले नसते. त्यामुळे त्यात काही प्रमाणात अमिबासह बॅक्टेरियासारख्या सूक्ष्मजीवांचे प्रमाण असू शकते. दरम्यान, लोकांना नळाचे पाणी पिऊन याचा संसर्ग होऊ शकत नाही. कारण पोटातील आम्ल सामान्यतः अशा जीवांना नष्ट करते.

मेंदू खाणारा अमिबा म्हणजे काय?

Naegleria fowleri हा एक अमिबा संसर्ग आहे. हा एक पेशी असलेला सजीव आहे. हा जीव अमेरिकेतील मातीसह तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे यासारख्या गोड्या पाण्यात आढळू शकतो. सामान्यपणे त्याला 'मेंदू खाणारा अमिबा' (brain-eating amoeba) असे म्हटले जाते. यामुळे मेंदूत संसर्ग होऊ शकतो. पोहताना अमिबा असेलेले पाणी नाकातून वर जाते. यामुळे तो शरिरात प्रवेश करतो. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, अमेरिकेत दरवर्षी सुमारे ३ लोकांना याचा संसर्ग होतो आणि हे संक्रमण प्राणघातक असते.

अमेरिकेत घेतला तिघांचा बळी

CDC नुसार, १९६२ ते २०२१ दरम्यान अमेरिकेतील १५४ लोकांपैकी केवळ ४ लोक मेंदू खाणाऱ्या अमिबा संसर्गातून वाचले आहेत. गेल्या वर्षी मीड तलावात पोहल्यानंतर एका मुलाला याचा संसर्ग झाला होता. त्यात या मुलाचा मृत्यू झाला. नेब्रास्कामध्ये पाण्यात पोहल्यानंतर संसर्ग झालेल्या दुसर्‍या एका मुलाचा मृत्यू झाला होता. आयोवामधील समुद्रात पोहोल्यानंतर मिसूरी येथील एका रहिवाशाचा अमिबा संसर्गाने मृत्यू झाला होता.

लक्षणे आणि उपचार

सुरुवातीला अति डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणे दिसून येतात. त्यानंतर मान आकडणे, फिट येणे आदी त्रास होऊन रुग्ण कोम्यात जाऊ शकतो. या जंतुसंसर्गावर अँटिबायोटिक अॅझिथ्रोमाइसीन, अँटीफंगल फ्लुकोनाझोल, अँटीमाइक्रोबियल ड्रग मिल्टेफोसिन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड डेक्सामेथासोन या औषधांच्या मिश्रणाचा उपचार केला जातो. (‍Brain-eating amoeba)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news