Breaking News : Indonesia Fire : जकार्तामध्ये अग्नितांडव; तेल डेपोला भीषण आग, 17 जणांचा मृत्यू, 50 जखमी | पुढारी

Breaking News : Indonesia Fire : जकार्तामध्ये अग्नितांडव; तेल डेपोला भीषण आग, 17 जणांचा मृत्यू, 50 जखमी

पुढारी ऑनलाइन डेस्क : Indonesia Fire : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील एका तेल डेपोमध्ये शुक्रवारी रात्री भीषण आग लागून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनावर लोक होरपळले आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. हा तेल डेपो सरकारी कंपनीचा असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Indonesia Fire : उत्तरी जकार्ता येथे सरकारी ऊर्जा कंपनी पेर्तामिनाच्या (Pertamina) तेल डेपोमध्ये शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. नंतर याठिकाणी भीषण अग्नितांडव सुरू झाले. ही भीषण आग पाहून आजूबाजूचे लोकांमध्ये दहशत पसरून अनेक जणांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू केली.

दरम्यान, Indonesia Fire : जकार्ता अग्निशमन केंद्राला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोबत प्रशासनाने आजूबाजूचा सर्व भाग खाली करून घेतला. उत्तर जकार्ताच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार किमान 17 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर कमीत कमी 50 च्या जवळपास लोक आगीत होरपळल्याने जखमी झाले आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री आठच्या सुमारास ही लागली. सध्या आग लागल्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इंडोनेशियाचे सेना प्रमुख दुडुंग अब्दुरचमन (Dudung Abdurachman) यांनी माध्यमांना सांगितले की, आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आग लागल्यानंतर अनेक तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सेना प्रमुख म्हटले की ते कारणांचा शोध घेत आहे. त्याच वेळी, पेरटामिना कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की आग आटोक्यात आणण्यासाठी आणि कामगार आणि आजूबाजूच्या भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम करत आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कंपनी अंतर्गत आढावा घेणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले.

हे ही वाचा :

Amazon Pay : आरबीआयची ‘अ‍ॅमेझॉन पे’वर कडक कारवाई; 3.06 कोटींचा ठोठावला दंड

Parenting Tips : मुलांमधील चुकीच्या सवयी मोडण्यासाठी पालकांनी ‘या’ गोष्टी कराव्या…

Back to top button