Amazon Pay : आरबीआयची ‘अ‍ॅमेझॉन पे’वर कडक कारवाई; 3.06 कोटींचा ठोठावला दंड | पुढारी

Amazon Pay : आरबीआयची 'अ‍ॅमेझॉन पे'वर कडक कारवाई; 3.06 कोटींचा ठोठावला दंड

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रीपेड पेमेंटमध्ये नियमांचे पालन केले नसल्याने ‘अ‍ॅमेझॉन पे’ला (Amazon Pay) तब्बल ३ कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स अ‍ॅक्ट, 2007 च्या कलम 30 अंतर्गत ही आर्थिक कारवाई केली आहे. आरबीआयने शुक्रवारी ही माहिती दिली.

आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, अ‍ॅमेझॉन (Amazon Pay) केवायसी नियमांबाबत आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे पालन करत नाही. नोटीस बजावून निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड का लागू करू नये, याची कारणे दाखवा असा सल्ला दिला होता. तपासात निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप खरा असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रीपेड पेमेंट मानके (पीपीआय) संबंधित काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 3.06 कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावला असल्याचे आरबीआयने सांगितले. तसेच हा दंड नियमांचे पालन न केल्याने केला आहे. ‘अ‍ॅमेझॉन पे’ (Amazon Pay) द्वारे त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हेतू नसल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button