टेक नंतर आता टेलिकॉम इंडस्ट्रीत सर्वात मोठी नोकरकपात, Ericsson मधून ८,५०० जणांना नारळ!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेलिकॉम उपकरणांची निर्माती करणारी एरिक्सन (Telecom equipment maker Ericsson) कंपनी खर्च कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून जागतिक स्तरावर ८,५०० कर्मचार्यांना काढून टाकणार आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. कंपनीने स्वीडनमधील सुमारे १,४०० नोकऱ्या कमी करण्याची योजना जाहीर केली आहे. एरिक्सनने जाहीर केलेली ही नोकरकपात टेलिकॉम इंडस्ट्रीतील सर्वात मोठी मानली जात आहे. याआधी आर्थिक परिस्थितीचे कारण देत Google, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या टेक दिग्गज कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. आता एरिक्सन कंपनीही त्यात सामील झाली आहे. (Ericsson will lay off 8,500 employees)
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोर्जे एकहोल्म यांनी कर्मचार्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये लिहिले आहे की, “नोकरकपात ही त्या त्या देशातील परिस्थितीनुसार केली जाईल.” एरिक्सनने जगभरात १ लाख ५ हजारहून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. विश्लेषकांनी याआधी असा अंदाज वर्तवला होता की नोकरकपातीचा सर्वाधिक फटका उत्तर अमेरिकेत बसेल आणि भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेवर याचा सर्वात कमी परिणाम होईल.
डिसेंबरमध्ये स्वीडिश टेलिकॉम कंपनी एरिक्सनने सांगितले की ते २०२३ च्या अखेरीस ८८० दशलक्ष डॉलरने खर्च कमी केला जाईल. कारण उत्तर अमेरिकेसह काही बाजारपेठांमधून प्रोडक्ट्सची मागणी कमी झाली आहे. “स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा खर्च भरून काढणे ही आमची जबाबदारी आहे,” असे एकहोल्म यांनी मेमोमध्ये म्हटले आहे.
एरिक्सनचे मुख्य वित्तीय अधिकारी कार्ल मेलँडर यांनी याआधी Reuters वृत्तसंस्थेला सांगितले होते की खर्च कपातीमध्ये कन्सल्टंट्स, रिअल इस्टेट आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे याचा समावेश असेल.
नोकरकपाची घोषणा
गेल्या महिन्यात Google ने १२ हजार नोकऱ्या कपातीची घोषणा केली होती. तर मायक्रोसॉफ्टने सांगितले की ते १० हजार नोकऱ्या कमी करेल. याआधी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी घोषणा केली होती की त्यांची कंपनी २०२३ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस १० हजार नोकऱ्या कमी करेल.
Ericsson to lay off 8,500 employees -memo https://t.co/Bz4LtJQCRw pic.twitter.com/3YT47yXA8a
— Reuters (@Reuters) February 24, 2023
हे ही वाचा :
- Go Mechanic Lay offs | स्टार्टअप्सना ग्रहण : आता गो मेकॅनिकमध्ये ७० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ
- McKinsey layoffs : मॅकॅन्सी कंपनीत नोकर कपात; २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ!