तुर्कीत 'बालवाडी'च्या उद्धवस्थ इमारतीवर फुगे लावून भूकंपातील मृत बालकांना श्रद्धांजली | पुढारी

तुर्कीत 'बालवाडी'च्या उद्धवस्थ इमारतीवर फुगे लावून भूकंपातील मृत बालकांना श्रद्धांजली

पुढारी ऑनलाईन: दक्षिण तुर्कीच्या विनाशकारी भूकंपाने सीरियाला देखील धक्के बसले. या महाप्रलयकारी भूकंपात आत्तापर्यंत ४६ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला. दरम्यान अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुर्कीत एका कोसळलेल्या बालवाडीच्या इमारतीच्या ढिगाऱ्यावर लाल, निळे आणि गुलाबी रंगाचे फुगे लावून भूकंपातील मृत बालकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. त्यांच्या स्मरणार्थ हे फुगे लावण्यात आली असल्याची माहिती अनाडुलू या तुर्कीतील वृत्तसंस्थेने दिली आहे.

दक्षिण तुर्कीत १२ दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत ४६ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तुर्कीत सर्वाधिक ४०, ४०२ लोकांचा, तर शेजारच्या सीरियामध्ये ५८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये हजारो बालकांचा देखील समावेश आहे. सुमारे २९६ तासांच्या मदत आणि बचाव कार्यानंतर आता जीव वाचण्याची आशा फार कमी आहे. तसेच अशा स्थितीत आज (रविवार) रात्रीपासून बचावकार्य थांबण्याची शक्यता असल्याचेही आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले आहे.

बचावकार्य बंद झाल्यानंतर ढिगारा त्वरीत हटवला जाईल. यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह समोर येऊ शकतात, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये सुमारे तीन लाख घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक महत्त्वाची शहरे उद्ध्वस्त झाली आहेत.

हेही वाचा:

Back to top button