YouTube CEO Resigns : युट्यूबच्या सीईओ सुसान वोजसिकी यांनी दिला राजीनामा

YouTube CEO Resigns : युट्यूबच्या सीईओ सुसान वोजसिकी यांनी दिला राजीनामा

कॅलिफोर्निया; पुढारी ऑनलाईन : यूट्यूब सीईओ सुसान वोजसिकी (Susan Diane Wojcicki) यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. गुगलची (Google) मूळ कंपनी अल्फाबेट इंकने (Alphabet Inc) गुरुवारी सांगितले की, यूट्यूबच्या (YouTube) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुसान डियान वोजसिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वोजसिकी सांगितले की त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवायचा आहे. तसेच त्यांना त्याच्या आरोग्यावर आणि वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. राजिनाम्याचा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहतील असे वोजसिकी यांनी सांगितले आहे. (YouTube CEO Resigns)

सुसान वोजसिकी या Google च्या सुरुवातीच्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत. इतकेच नाही तर त्या जवळपास २५ वर्षांपासून गुगलच्या मूळ कंपनीसोबत आहेत. 2014 मध्ये त्या यूट्यूबच्या सीईओ बनल्या. आता नऊ वर्षांनी त्यांनी हे पद सोडले. (YouTube CEO Resigns)

सुसान वोजसिकी यांच्यानंतर भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन कंपनीची जबाबदारी स्वीकारतील. नील यांच्या करिअरची सुरुवात ग्लोरिफाईड टेक्निकल सपोर्टने झाली. येथे त्यांना 60 हजार डॉलर इतका पगार मिळत असे. नील २००८ मध्ये Google मध्ये सामील झाले, जेव्हा त्याची पूर्वीची कंपनी DoubleClick ला गुगलने विकत घेतले.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news