न्यूझीलंडमध्ये भूंकप : 6 रिश्टर स्केलचा तीव्र झटका | पुढारी

न्यूझीलंडमध्ये भूंकप : 6 रिश्टर स्केलचा तीव्र झटका

पुढारी ऑनलाईन : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर आता न्यूझीलंडला भूकंपाचा झटका बसला आहे. ६ रिश्टर स्केलच्या भूकंपाने वेलिंग्टन परिसर हादरून गेला आहे. न्यूझीलंडमधील प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ७.३८ मिनिटांनी हा भूकंप झाला. पारापारौमू येथे पृष्ठभागाखाली ४८ किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.

न्यूझीलंडला नुकताच गॅब्रिएल या चक्रीवादळचा तडका बसला आहे, या चक्रीवादळामुळे न्यूझीलंडमध्ये राष्ट्रीय आणीबाणीही घोषित करण्यात आली आहे. हे संकट असतानाचा भूकंपाचाही झटका बसला आहे. या भूकंपात किती नुकसान झाले आहे, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

हेही वाचा

Back to top button