Earthquake in Assam : आसाममधील नागावला भूकंपाचे धक्‍के | पुढारी

Earthquake in Assam : आसाममधील नागावला भूकंपाचे धक्‍के

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसामच्या नागाव येथे आज (दि. १२) ४.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्‍का बसला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी संस्थेने याची माहिती ट्विटच्‍या माध्‍यमातून दिली. ४ वाजून १८ मिनिटांनी  भूकंपाचा धक्‍का बसला. (Earthquake in Assam)

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी संस्थेने ट्विटमध्ये म्‍हटलं आहे की, आसाममधीलन नागाव येथे  ४.० रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्‍का बसला आहे. लडाख आणि गुजरात येथे देखील गेल्या दोन दिवसांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

६ फेब्रुवारी रोजी तुर्कस्तान आणि सीरियामध्ये शक्‍तीशाली भूकंपाने प्रचंड जीवित आणि वित्त हानी झाली आहे. दोन्‍ही देशांतील भूकंपबळींची संख्‍या २८ हजारपेक्षा अधिक झाली आहे. मृतांचा आकडा ५० हजारापर्यंत जाईल, अशी भीती संयुक्‍त राष्‍ट्राच्‍या मदत पथकाने व्‍यक्‍त केली आहे.

हेही वाचा

Back to top button