तुर्कीत मृतांची संख्या 'आठ' पटीने वाढू शकते : WHO चा दावा | पुढारी

तुर्कीत मृतांची संख्या 'आठ' पटीने वाढू शकते : WHO चा दावा

पुढारी ऑनलाईन: तुर्कीत सोमवारी झालेल्या शक्तीशाली भूकंपानंतर पुन्हा सलग दोन धक्के बसले आहेत. तुर्कीसह सीरियामध्येहीभूकंपाने कहर केला आहे . गेल्या काही तासांत भूकंपाचे तीन मोठे धक्के बसल्याने तुर्कीत मोठा हाहाकार उडाला आहे. सीरियातही तीच परिस्थिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर २० हजारांहून अधिक जखमी आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या भूकंपातील मृत्यूचा आकडा हा आणखी आठ पटीने वाढू शकतो, असा दावा  केला आहे.

WHO नेमक काय म्हच म्हटले?

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, ‘अशा भूकंपाच्या घटनांमध्ये सुरुवातीला मृत आणि जखमींची संख्या ही कमी असते, कालांतराने ही संख्या वेगाने वाढते. तुर्कीतील भूकंपामुळे बेघर झालेल्यांची परिस्थितीही अशीच आहे. दरम्यान भूकंपाचे धक्के बसणे सुरूच असून, यामुळे लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील तापमानात देखील प्रचंड बदल जाणवत आहेत. सतत पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे थंडी देखील वाढली आहे. त्यामुळे बेघर झालेल्या लोकांवर व अन्य नागरिकांवर याचा परिणाम होऊन आणखी अडचणी वाढू शकतात, असेही WHO ने म्हटले आहे.

भूकंपामुळे चार देशांत मोठी हानी

सोमवारी झालेल्या भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियासह चार देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. पहाटे झालेल्या शक्तीशाली (तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8) भूकंपानंतर एकाच दिवशी सलग तीनवेळा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून, अनेक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तुर्कीमध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये किमान 4000 लोक मारले गेले आहेत आणि 20,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 10 शहरांमधील 1,700 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले, असे अहवालात देशाचे उपाध्यक्ष फियाट ओकटे यांचा हवाला देत म्हटले आहे. त्याचवेळी सीरियामध्ये किमान 783 लोक मारले गेले आणि 639 जखमी झाले. इस्रायल आणि लेबनॉनमध्येही अनेक मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

Back to top button