भारतात बनलेल्या कफ सिरपमुळे ३०० मुलांचा मृत्यू, WHO चा दावा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन : भारतात तयार झालेल्या कफ सिरपमुळे ऑगस्ट २०२२ पासून ते आत्तापर्यंत तीन देशांतील ३०० मुलांचा मृत्यू झाला असल्याचा धक्कादायक दावा WHO ने केला आहे. अद्याप स्थानिक प्राधिकरणाकडून यासंदर्भातील माहिती गोळा करणे सुरू असल्याचे देखील WHO ने सांगितले आहे.

जागतिक बाजारपेठेतील निकृष्ट आणि खोट्या वैद्यकीय उत्पादनांचा सामना करण्यासाठी अमेरिकेतील आरोग्य संघटनेने देखील पाऊले उचलली आहेत. यासंदर्भात उत्पादक संघटन आणि समाजातील काही घटकांशी संघटनेकडून या समस्यांवर चर्चा सुरू असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

अशा घटना रोखण्यासाठी, याविषयी शोध घेऊन उपाययोजना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) कंपनीच्या भागधारकांशी सल्लामसलत करत आहे. तसेच या समस्यांचा WHO सखोल अभ्यास करत, समस्येवर योग्य मार्गदर्शन घेत, आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामधील संघटना आणि कफ सिरप उत्पादक कंपन्या या महत्त्वाचा दुवा असल्याचेही संघटनेच्या प्रवक्याने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news